Nitin Desai | एडलवाईडजच्या अधिकाऱ्यांनी चौकशीत दिली अपूर्ण माहिती? देसाई यांच्या निधनानंतर मोठी अपडेट समोर

आज सकाळी सात वाजेपर्यंत सुरु होती एडलवाईडज कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी.. चौकशी दरम्यान नक्की घडलं तरी काय? पोलिसांनी मोठी अपडेट समोर

Nitin Desai | एडलवाईडजच्या अधिकाऱ्यांनी चौकशीत दिली अपूर्ण माहिती? देसाई यांच्या निधनानंतर मोठी अपडेट समोर
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 8:15 AM

मुंबई | 8 ऑगस्ट 2023 : सिनेविश्वातील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतः उभारलेल्या एनडी स्टुडिओमध्ये शेवटचा श्वास घेतला. देसाई यांनी टोकाचा निर्णय घेतल्यानंतर सेलिब्रिटी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नितीन देसाई यांच्या निधनानंतर पोलिस कसून चौकशी करत आहेत. आर्थिक विवंचनेतून नितीन देसाई यांनी आत्महत्या केली असं चौकशीतून समोर येत आहे. याप्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे. नितीन देसाई यांनी एडलवाईज कंपनी कडून १८० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. बुधवारी सकाळी देखील एडलवाईडजच्या एमडींची चौकशी झाली. चौकशीबद्दल पोलिसांनी मोठी माहिती दिली आहे.

‘कंपनीचे एमडी, मॅनेजिंग डायरेक्टर आणि वरिष्ठ अधिकारी आज सकाळपासून हजर होते. सकाळी सात वाजेपर्यंत सर्व कागदपत्रांची चौकशी केली आहे. कागदपत्रांमध्ये काही माहिती अपूर्ण आणि पुरेशी नसल्यामुळे कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा ११ तारखेला सकाळी १० वाजता अपूर्ण कागदपत्र आणि आवश्यक माहिती जी आम्हाला हवी आहे, ती सर्व माहिती घेऊन पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

एडलवाईडजच्या एमडींना ११ तारखेला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडून सध्या चौकशी सुरु आहे. सर्व कागदपत्र घेऊन पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना एडलवाईडजच्या एमडींना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नितीन देसाई यांनी एडलवाईज कंपनी कडून १८० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. कर्जावरील व्याज वाढत कर्जाची किंमत २५२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. कोरोना काळानंतर कर्जाचे हप्ते फेडण्यात अडचणी येत होत्या. त्यात कर्जाचा बोजा वाढत चालला होता. एनडी स्टुडिओवर जप्तीची कारवाईची प्रक्रिया होऊ शकली असती. नितीन देसाई त्याच तणावाखाली होते.

मानसिक त्रास होत असल्यामुळे नितीन देसाई यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला असं देखील त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं. जीवन संपवण्याआधी त्यांनी काही ऑडिओ रेकॉर्डिंग्स केले होते. त्यात चार जणांची नाव आहेत. याप्रकरणी पोलीस आता कसून चौकशी करत आहेत.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.