Nora Fatehi | इथे फक्त 3-4 जणींनाच मिळतं काम, दिग्दर्शक बाकीच्यांकडे बघतही नाहीत…लीड रोल न मिळाल्याने नोरा फतेही संतापली
चित्रपटात प्रमुख भूमिका मिळत नसल्याने नोरा फतेही दु:खी झाली आहे. फिल्ममेकर्स एका ठराविक दृष्टिकोनाबाहेर विचार करतच नाहीयेत, अशी टीका तिने केली आहे.

Nora Fatehi On Lead Roles : उत्तम नृत्यकौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नोरा फतेही ( Nora Fatehi) ने ‘स्ट्रीट डान्सर 3D’ पासून अभिनयाची कारकीर्द सुरू केली. त्यानंतर तिला काही चित्रपटांत कामही मिळाले पण, साकी-साकी, दिलबर, गर्मी यांसारख्या आयटम साँग्समुळेच तिला ओळख मिळाली. पण नोराला सध्या अभिनयात जास्त रस आहे. चित्रपटांत मुख्य भूमिका मिळत नसल्याने ती दु:खी झाली असून इंडस्ट्रीत फक्त त्याच त्या ३-४ चेहऱ्यांना (अभिनेत्रींना) काम मिळतं असा आरोपही तिने केला आहे.
फक्त चार जणींनाच मिळतं काम – नोरा
एका मुलाखतीत नोराने तिची व्यथा मांडली आहे. कोणाचेही नाव न घेता ती म्हणाली की फिल्ममेकर्स एका ठराविक चौकटीच्या बाहेर विचारच करत नाहीत. इंटस्ट्रीमध्ये फक्त ३-४ अभिनेत्री आहेत, ज्यांना काम मिळत आहे. नोरा पुढे म्हणाली की, मी फक्त डान्स करते म्हणून मला कास्ट करावं असं माझं म्हणणं नाही. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या उत्तम डान्स करतात आणि त्यांचे डान्स नंबर्सही कमाल आहेत. हे चांगल्या अभिनेत्रीच्या पॅकेजचा भाग आहे.
कदाचित तिच्यापेक्षा कोण चांगला अभिनय करू शकतो, संवाद चांगले देऊ शकतो हे पाहिले जात असे. जिला चांगलं बोलता येते, भाषा चांगली आहे, असेही नोरा म्हणाली.
View this post on Instagram
फिल्ममेकर्स त्यांच्या विचारांच्या बाहेर पाहू शकत नाहीत
इंडस्ट्रीमध्ये सध्या स्पर्धा वाढली आहे. एका वर्षांत काहीच चित्रपट येतात आणि चित्रपट निर्माते त्यांच्या विचारांबाहेर पाहू शकत नाहीत की त्यांच्यासमोर काय पर्याय आहेत. ज्या ४ अभिनेत्री काम करत आहेत, त्यांनाचा वारंवार पुन्हा काम मिळतं. निर्मात्यांनाही त्याच चार मुली लक्षात राहतात. त्यांना त्या पलीकडे जाऊन विचार करायचात नाही, अशी टीकाही नोराने केली.