AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Esha Deol | तेव्हा आईचं ऐकलं असतं तर… वाचला असता ईशा देओलचा संसार ?

मुंबई | 15 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडची ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांची लेक आणि अभिनेत्री ईशा देओल सध्या आयुष्याच्या कठीण फेजमधून जात आहे. तिने नुकताच तिचा पती भरत तख्तानी याला घटस्फोट देण्याचा निर्णय जाहीर केला. दशकभराच्या संसारानंतर ईशा-भरत वेगळे होत आहेत. ते दोघेही बराच काळ एकमेकांसोबत राहत नसल्याची बातमीदेखील समोर आली आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा […]

Esha Deol | तेव्हा आईचं ऐकलं असतं तर... वाचला असता ईशा देओलचा संसार  ?
| Updated on: Feb 15, 2024 | 10:02 AM
Share

मुंबई | 15 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडची ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांची लेक आणि अभिनेत्री ईशा देओल सध्या आयुष्याच्या कठीण फेजमधून जात आहे. तिने नुकताच तिचा पती भरत तख्तानी याला घटस्फोट देण्याचा निर्णय जाहीर केला. दशकभराच्या संसारानंतर ईशा-भरत वेगळे होत आहेत. ते दोघेही बराच काळ एकमेकांसोबत राहत नसल्याची बातमीदेखील समोर आली आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की भरत तख्तानीने ईशा देओलची फसवणूक केल्यामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

2012 साली ईशा आणि भरत यांचा विवाह झाला होता. त्यांना दोन गोड लेकीही आहेत. मात्र 6 फेब्रुवारी 2024 ला ईशा आणि भरत या दोघांनी एक अधिकृत निवेदन जारी करत वेगळं होत असल्याचा निर्णय जाहीर केला. सध्या ईशा देओल ही तिची आई हेमामालिनी यांच्यासोबतच रहात आहे. सोशल मीडियावर घोषणा करण्यापूर्वीच ईशा- भरत एकमेकांपासून वेगळे रहात होते. बऱ्याच काळापासून ईश ही तिच्या दोन मुलींसह आईच्या घरी शिफ्ट झाली होती. सध्या ती तिच्या प्रोफेशनल आयुष्यात बिझी असून तिच्या हातात अनेक प्रोजेक्ट्सही आहेत. घटस्फोटानंतर मुलींच्या संगोपनासाठी आणि एकूणच इशाला कोट्यवधींची पोटगी मिळू शकते अशी माहिती आहे.

मात्र तिच्या घटस्फोटाच्या वृत्तानंतर अशी चर्चासुद्धा सुरू आहे की भरत तख्तानी ऐवजी दुसऱ्या एका व्यक्तीशी ईशाने लग्न करावे अशी तिच्या आईची अर्थात हेमामालिनीची इच्छा होती.

अभिषेक बच्चन जावई म्हणून होता पसंत

ईशा देओल आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांचं लग्न व्हावं अशी हेमामालिनी यांची एकेकाळी इच्छा होती असा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. यासंदर्भात हेमामालिनी यांनी स्वत: अभिषेकचे वडील आणि विख्यात अभिनेते, बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्याशी बोलणं केलं होतं. ईशा -अभिषेकच्या लग्नाबद्दल दोघांची चर्चा झाली होती. मात्र ईशाला अभिषेक जोडीदार म्हणून पसंत नव्हता. मी त्याला मोठ्या भावाप्रमाणे मानते असे सांगत ईशाने हे नातं जोडण्यास थेट नकार दिला होता.

अभिषेक-ईशाचे चित्रपट

ईशा देओल आणि अभिषेक बच्चन यांनी धूम (2004), LOC-कारगिल (2003), दस (2005) आणि युवा (2004) या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पण, त्यांच्या लग्नाची चर्चा एका दिवसात संपली कारण ईशा देओलने तिच्या आईला स्पष्टपणे सांगितले होते की तिला अभिषेकशी लग्न करायचे नाही. यानंतर 2012 मध्ये ईशाने तिचा बॉयफ्रेंड भरतसोबत लग्न केले.

ईशा-भरतचा घटस्फोट

रेडिटवर एक पोस्ट व्हायरल झाली होती ज्यामध्ये ईशा देओल आणि भरत तख्तानी वेगळे झाले असावेत असा दावा करण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून ईशा देओल आणि तिचा पती भरत तख्तानी सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसत नाहीत, असे पोस्टमध्ये म्हटले होते. हेमामालिनी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या दिवशीदेखील भरत अनुपस्थित होता. एवढंच नव्हे तर भरत ईशाची फसवणूक करत असल्याचा दावाही युजरने केला. भरतचे दुसऱ्या महिलेसोबत अफेअर होते, असे पोस्टमध्ये म्हटले होते. त्यानंतर काही दिवसांतच ईशा-भरतने आपण वेगळं होत असल्याचे जाहीर केले.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.