Dharmendra यांनीच नाही तर, ‘या’ ४ सेलिब्रिटींनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता केलं दुसरं लग्न

पतीने दुसरं लग्न केल्यामुळे सेलिब्रिटींच्या पहिल्या पत्नीच्या आयुष्यात दुखाःचा डोंगर; एका अभिनेत्याची पत्नी म्हणाली, 'ते उत्तम पती होवू शकले नाहीत,पण....'

Dharmendra यांनीच नाही तर, 'या' ४ सेलिब्रिटींनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता केलं दुसरं लग्न
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 1:57 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर दुसरं लग्न केलं. पण काही सेलिब्रिटी असे देखील आहेत, ज्यांनी समाजाचा आणि इतर सर्व गोष्टींचा विरोध करत फक्त स्वतःच्या भावनांना अधिक महत्त्व दिलं. फक्त अभिनेते धर्मेंद्र यांनीच नाही तर, अन्य पाच सेलिब्रिटींनी देखील पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न केलं. धर्मेद्र यांनी दुसरं लग्न अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं.

दुसऱ्या लग्नानंतर धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने खंत व्यक्त केली होती. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर म्हणाल्या की, ‘धर्मेंद्र कधीच उत्तम पती होवू शकले नाहीत, पण ते वडील म्हणून कायम मुलांसाठी सतर्क असतात…’ आज अशा चार सेलिब्रिटींबद्दल जाणून घेवू ज्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न केलं…

सलीम खान | अभिनेता सलमान खान याचे वडील सलीन खान यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता बॉलिवूडच्या डान्सिंग क्विन हेलन यांच्यासोबत लग्न केलं. सुरुवातील अनेक विरोध आणि वाद झाले. पण आता सलीम खान यांच्या दोन्ही पत्नी एकमेकींसोबत आनंदात एकाच छता खाली राहतात.

हे सुद्धा वाचा

अभिनेते राज बब्बर | राज बब्बर यांच्या पहिल्या पत्नीचं नाव नादिरा झहीर असं आहे. राज बब्बर यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यासोबत लग्न केलं. एवढंच नाही तर, स्मिता पाटील आणि राज बब्बर अनेक वर्ष लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत होते. रिपोर्टनुसार, दुसऱ्या पत्नीचं निधन झाल्यानंतर राज बब्बर पुन्हा पहिल्या पत्नीकडे गेले.

गायक उदित नारायण | उदित नारायण यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दीपा गहतराज यांच्यासोबत लग्न केलं. दुसऱ्या लग्नानंतर गायकाच्या पहिल्या पत्नी रंजना झा यांनी कायद्याची मदत देखील घेतली होती. त्यानंतर रंजना झा यांना उदीत यांच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान मिळालं.

दिग्दर्शक महेश भट्ट् | ७४ वर्षीय महेश भट्ट यांनी पहिल्या पत्नी किरण भट्ट यांना घटस्फोट न देता, सोनी राजदान यांच्यासोबत लग्न केलं. रिपोर्टनुसार, महेश भट्ट यांनी धर्म बदलत अभिनेत्री सोनी राजदान यांच्यासोबत लग्न केलं. महेश भट्ट आणि सोनी राजदान यांना दोन मुली आहेत…

सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. खासगी आयुष्यात आलेल्या चढ-उतारांमुळे सेलिब्रिटी आजही चर्चेत असतात. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यां नात्याची चर्चा कायम रंगलेली असते…

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.