Nude Photo Controversy : ट्रोलर्सला मिलिंद सोमण यांचं उत्तर, म्हणाले जसं तुम्ही कधी इंटरनेटवर…..
न्यूड फोटोशूट संदर्भात मिलिंद सोमण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Nude Photo Controversy: Milind Soman's answer to trollers)
मुंबई : मॉडेल, अभिनेता, फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. सोशल मीडियावर नवनवीन पोस्ट करत ते चाहत्यांच्या भेटीला येतात. एवढंच नाही तर पत्नी अंकितासोबतही ते नवनवीन फोटो शेअर करत असतात. मिलिंद यांनी त्यांच्या वाढदिवसाला सोशल मीडियावर एक न्यूड फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ते समुद्र किनाऱ्यावर पळताना दिसत होते. त्यानंतर आता मिलिंद यांच्या या फोटोभोवती वादविवाद फिरत आहेत. या फोटोवरुन त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. आता मिलिंद यांनी एका इंटरव्यूमध्ये न्यूड फोटो कॉन्ट्रोवर्सी बद्दल भाष्य केलं आहे.
View this post on Instagram
इटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मिलिंद सोमण हे न्यूड फोटो कॉन्ट्रोवॉर्सीवर बोलताना म्हणाले की- मला काही कळलं नाही की लोक असं का वागत होते जसं त्यांनी यापूर्वी कधी कुणाला न्यूड बघितलं नाही. मिलिंद सोमण यांनी ट्रॉल्सवरही भाष्य केलं, ट्रोलिंग काय आहे आणि का आहे त्याच्याकडे मी जास्त लक्ष देत नाही.
मिलिंद यांनी सांगितलं की- ते ट्रोलर्सला नोटिस करत नाहीत. कधी कधी कमेंट वाचतात तेही मज्जा म्हणून. ते पुढे म्हणाले- तुम्ही जर तो फोटो पाहिला तर तो ट्रोलिंगसाठी नाहीये. मला माहिती नाही ट्रोलिंग कशाला म्हणतात. जेव्हा मी काही लोकांचं निरीक्षण करतो आणि त्यांच्या सोशल मीडियावर ट्रोल्स बघतो तेव्हा मला काळजी वाटते कारण अशा परिस्थितीत स्वत:ला सांभाळणं अवघड असतं. तुमच्याबद्दल जेव्हा हजारो लोक नकारात्मक बोलतात तेव्हा तो अटॅक केल्यासारखा असतो.
मिलिंद पुढे म्हणाले- माझ्या न्यूड फोटोवर 99 टक्के लोकांच्या कमेंट्स मस्त किंवा सकारात्मक होत्या. हा फोटो माझ्या बायकोनं क्लिक केलाय त्यासाठी मी फोटोग्राफर नव्हता हायर केला. तुम्ही इंस्टाग्रामवर हॅशटॅग नेकेड टाका तुम्हाला 10 मिलियन न्यूड फोटोज मिळतील.
मिलिंद यांनी न्यूड फोटोशूट केल्याची ही पहिली वेळ नव्हती. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक न्यूड फोटोशूट केले आहेत. मिलिंद यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की – ‘जेव्हा मी प्रथमच न्यूड फोटोशूट केलं तेव्हा मी बर्याच चर्चेत आलो होतो. त्याआधीही मी बर्याचवेळा न्यूड फोटोशूट्स केले आहेत. प्रत्येक वेळी वेगळी प्रतिक्रिया आढळली. यात काय वेगळे आहे? असं नाही की आपण इंटरनेटवर नग्न लोकांना पाहिलं नाही, इंस्टाग्रामवर बरेच न्यूड फोटो आहेत. किंवा न्यूड फोटोशूट करणं हे अनेकांचं स्वप्न आहे.
संबंधित बातम्या
Liger : विजय देवरकोंडाचा ‘LIGER’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Miss India 2020 | तेलंगणाच्या मानसा वाराणसीच्या डोक्यावर मिस इंडियाचा ताज