Nushrratt Bharuccha | नुसरत भरुचा हिचे मोठे विधान, ‘ड्रीम गर्ल 2’बद्दल भाष्य, थेट म्हणाली, माझ्यासोबत नक्कीच
बाॅलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे नुसरत भरुचा ही ड्रीम गर्ल 2 चित्रपटात दिसणार नसल्याचे कळाल्यापासून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. ड्रीम गर्ल 1 चित्रपट हिट होऊनही नुसरत भरुचा हिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

मुंबई : आयुष्मान खुराना याचा ड्रीम गर्ल 2 (Dream Girl 2) हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहेत. ड्रीम गर्ल 2 धमाका करेल असेही सांगितले जात आहे. या चित्रपटाकडून निर्मात्यांना देखील मोठ्या अपेक्षा नक्कीच आहेत. ड्रीम गर्ल 1 धमाल करताना दिसला, चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठे प्रेम देखील दिले. ड्रीम गर्ल 2 चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना याच्यासोबत चंकी पांडेची लेक अनन्या पांडे ही देखील मुख्य भूमिकेत आहे. ड्रीम गर्ल 2 मधून नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) हिचा पत्ता कट करण्यात आलाय.
नुसरत भरुचा ही ड्रीम गर्ल 1 मध्ये आयुष्मान खुराना याच्यासोबत मुख्य भूमिकेत होती. विशेष म्हणजे चाहत्यांना नुसरत भरुचा आणि आयुष्मान खुराना यांची जोडी देखील प्रचंड आवडली होती. चित्रपटानेही धमाका केला. मात्र, असे असतानाही नुसरत भरुचा हिला ड्रीम गर्ल 2 मधून थेट बाहेरचा रस्ता हा दाखवण्यात आला.
ड्रीम गर्ल 2 चित्रपटात नुसरत भरुचा दिसणार नसल्याने चाहते देखील निराश झाल्याचे बघायला मिळाले. नुसरत भरुचा हिच्या चाहत्यांनी तर थेट ड्रीम गर्ल 2 मध्ये नुसरत भरुचा नाही तर चित्रपट बघणार नसल्याचे देखील म्हटले आहे. मात्र, ड्रीम गर्ल 2 मधून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर पहिल्यांच जाहिरपणे बोलताना नुसरत भरुचा दिसली आहे.
नुसरत भरुचा म्हणाली की, मी ड्रीम गर्ल 2 चित्रपटाच्या टिमला खूप जास्त मिस करते. मी चित्रपटामध्ये का नाहीये याचे उत्तर नक्कीच माझ्याकडे नाहीये. मी पण एक माणूसच आहे, या सर्व गोष्टींमुळे माझेही मन दुखते. माझ्यासोबत कुठेतरी चुकीचे झाले आहे. मात्र, कोणाला काय बोलणार ना.
मला खरोखरच वाईट वाटते की, मी आज ड्रीम गर्ल 2 चा हिस्सा नाहीये. याप्रकारे ड्रीम गर्ल 2 चित्रपटामध्ये नसल्याचे दु:ख व्यक्त करताना नुसरत भरुचा ही दिसली आहे. नुसरत भरुचा हिच्याऐवजी निर्मात्यांनी अनन्या पांडे हिला या चित्रपटामध्ये घेतले आहे. यानंतर अनेकांनी नेपोटिझमचा आरोप थेट केला.
मुळात म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अनन्या पांडे हिचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे हिचा लाईगर हा चित्रपट रिलीज झाला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील अनन्या पांडे ही दिसली होती. मात्र, तो चित्रपट फ्लाॅप गेला. सध्या अनन्या पांडे ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे.