Salman Khan: ‘या’ व्यक्तीने केली होती सलमान खानची रेकी; पोलिसांकडून चौकशी सुरू

सलमान खानची रेकी तीन जणांनी केली होती. त्यापैकी कपिल पंडितला (Kapil Pandit) पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

Salman Khan: 'या' व्यक्तीने केली होती सलमान खानची रेकी; पोलिसांकडून चौकशी सुरू
सलमान खानच्या बॉडी डबलचा हृदयविकाराने मृत्यू
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 3:18 PM

पंजाबी रॅपर आणि गायक सिद्धू मूसेवालाच्या (Sidhu Moose Wala) निधनानंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीने त्यांच्या काही सदस्यांना अभिनेता सलमान खानची (Salman Khan) रेकी करण्यास सांगितलं होतं. सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर सलमान खानच्या वडिलांना धमकीचं पत्र मिळालं होतं. ‘तुमचाही मुसेवाला करू’ अशी धमकी त्या पत्रातून देण्यात आली होती. यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. सलमान खानची रेकी तीन जणांनी केली होती. त्यापैकी कपिल पंडितला (Kapil Pandit) पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

कपिल पंडितची पोलिसांकडून चौकशी सुरू

पंजाब पोलिसांचे डीजीपी गौरव यादव यांनी याबद्दलची माहिती देताना सांगितलं, “अटक केलेल्या आरोपींपैकी एक कपिल पंडित याने चौकशीदरम्यान सांगितलं की लॉरेन्स बिश्नोईच्या सूचनेनुसार तो सचिन बिश्नोई आणि संतोष यादव यांच्यासह सलमान खानला टार्गेट करण्यासाठी मुंबईत आला होता. त्यानेच रेकीसुद्धा केली होती. आम्ही त्या इतरांचीही चौकशी करणार आहोत.”

“काल आम्ही मुसेवाला हत्या प्रकरणात 3 जणांना अटक केली. दीपक मुंडीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने ही अटक करण्यात आली आहे. गोल्डी ब्रार या प्रकरणातील मास्टर माईंड आहे,” अशी माहिती डीजीपी गौरव यादव यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

डीजीपी गौरव यादव पुढे म्हणाले, “कपिल नावाच्या व्यक्तीने त्याला नेपाळमध्ये आश्रय दिला होता. दीपक मुंडीला दुबईला पाठवण्याची त्यांची योजना होती. कपिल पंडित नावाच्या व्यक्तीने सलमान खानची रेकीही केली होती. मनप्रीत भाऊ आणि मनप्रीत मन्ना यांच्या अटकेनंतरच आम्हाला याबद्दलचे पहिले इनपुट्स मिळाले आहेत. परदेशात बसलेल्या सर्व आरोपींना पकडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 23 जणांना अटक करण्यात आली आहे.”

सलमानला शस्त्र बाळगण्याची परवानगी

सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर त्याने आपल्या सुरक्षेसाठी शस्त्र बाळगण्याच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. पोलिसांकडून त्याला परवाना देण्यात आला. लॉरेन्स बिश्नोई सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहेत. दिल्ली पोलिसांनी सलमानच्या धमकीप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचीही चौकशी केली. मात्र त्याने साफ नकार दिला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.