Oscar Awards 2025 Live: ऑस्करमध्ये ‘अनोरा’चा दबदबा; पटकावले 5 पुरस्कार
Oscar Awards 2025 Live Event Academy Awards Updates in Marathi: कलाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. ऑस्करमध्ये पुन्हा भारताच्या पदरी निराशाच आली आहे.

Oscar Awards 2025 Live: “अँड द ऑस्कर गोज टू…” हे शब्द ऐकण्यासाठी कलाविश्वातील प्रत्येक कलाकार आतूर असतो. चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठित 97 वा ‘अकॅडमी अवॉर्ड्स’ म्हणजेच ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यंदा कॉमेडियन आणि पॉडकास्टर कॉनन ओब्रायनने या सोहळ्याचं पहिल्यांदाच सूत्रसंचालन केलं. याआधी त्याने 2002 आणि 2006 मध्ये एमी अवॉर्ड्सचं सूत्रसंचालन केलं होतं. 2025 या वर्षातील ऑस्कर पुरस्काराबद्दल कलाकारांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अनोरा, द ब्रुटलिस्ट, अ कम्प्लिट अननोन, कॉनक्लेव्ह, ड्युन: पार्ट टू, एमिलिया पेरेझ, आय एम स्टिल हिअर, निकेल बॉईज, द सबस्टन्स आणि विकेड हे चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकित झाले होते. त्यापैकी अनोरा या चित्रपटाने पाच ऑस्कर पुरस्कार आपल्या नावे केले आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
Oscar Awards 2025 Live: ‘अनोरा’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट
‘अनोरा’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे. या चित्रपटाने यंदा पाच ऑस्कर पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. अॅलेक्स कोको, समांथा क्वान आणि शॉन बेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे.
-
Oscar Awards 2025 Live: ‘अनोरा’साठी माईकी मॅडिसनने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
पुन्हा एकदा ‘अनोरा’ या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कार आपल्या नावे केला आहे. या चित्रपटातील माईकी मॅडिसनने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे.
Academy Award winner Mikey Madison has a nice ring to it! Congratulations on winning the Oscar for Best Actress. #Oscars pic.twitter.com/90ILXEsbXa
— The Academy (@TheAcademy) March 3, 2025
-
-
Oscar Awards 2025 Live: ‘अनोरा’ या चित्रपटासाठी शॉन बेकरने पटकावला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार
शॉन बेकरने ‘अनोरा’ या चित्रपटासाठी तिसऱ्यांदा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले आणि बेस्ट फिल्म एडिटिंगनंतर बेस्ट डायरेक्टर म्हणूनही शॉन बेकरने ऑस्कर आपल्या नावे केला आहे.
-
Oscar Awards 2025 Live: एड्रियन ब्रोडीने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार
‘द ब्रुटलिस्ट’ या चित्रपटातील भूमिकेसाठी एड्रियन ब्रोडीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार आपल्या नावे केला आहे. ऑस्कर विजेता किलियन मर्फीच्या हस्ते एड्रियनला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
-
Oscar Awards 2025 Live: ‘द ब्रुटलिस्ट’ने पटकावला बेस्ट ओरिजिनल स्कोअरचा पुरस्कार
‘द ब्रुटलिस्ट’ या चित्रपटाच्या डॅनिअल ब्लुमबर्गने बेस्ट ओरिजिनल स्कोअरचा ऑस्कर पुरस्कार आपल्या नावे केला आहे.
-
-
Oscar Awards 2025 Live: बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्मचा पुरस्कार..
ब्राझिलच्या ‘आय ॲम स्टिल हिअर’ या चित्रपटाने बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.
Brazil snags the Oscar for Best International Feature Film. Congratulations to the cast and crew of I’M STILL HERE! 🇧🇷 #Oscars pic.twitter.com/uT5ELiigMg
— The Academy (@TheAcademy) March 3, 2025
-
Oscar Awards 2025 Live: ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताच्या पदरी निराशा
सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत भारताचा हिंदी लघुपट ‘अनुजा’ पराभूत झाला आहे. व्हिक्टोरिया वॉर्मरडॅमच्या ‘आय ॲम नॉट अ रोबोट’ने सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्मचा ऑस्कर जिंकला आहे. ‘अनुजा’ची निर्मिती गुनित मोंगा, प्रियांका चोप्रा जोनास आणि मिंडी कलिंग यांनी केला होता.
-
Oscar Awards 2025 Live: ‘द ब्रुटलिस्ट’ चित्रपटाने पटकावला बेस्ट सिनेमेटॉग्राफीचा पुरस्कार
लॉल क्राऊलीने ‘द ब्रुटलिस्ट’ या चित्रपटासाठी बेस्ट सिनेमेटॉग्राफीचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.
-
Oscar Awards 2025 Live: लॉस एंजिलिस अग्निशमन दलाचा अकॅडमीकडून सन्मान
दक्षिण कॅलिफोर्नियातील विनाशकारी वणव्याशी लढणाऱ्या लॉस एंजिलिस अग्निशमन दलाच्या जवानांचा 97 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात आला.
-
Oscar Awards 2025 Live: लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत भारताचा पुरस्कार हुकला
पॅट्रिस व्हर्मेट आणि शेन व्हियु यांच्या ‘आय ॲम नॉट अ रोबोट’ या शॉर्ट फिल्मने ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. प्रियांका चोप्रा आणि गुनित मोंगा निर्मित ‘अनुजा’ या शॉर्ट फिल्मला या श्रेणीत नामांकन मिळालं होतं. मात्र भारताचा ऑस्कर पुन्हा एकदा हुकला आहे.
-
Oscar Awards 2025 Live: ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जेम्स बाँडच्या गाण्यांना आदरांजली
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जेम्स बाँड फ्रँचाइजीच्या प्रतिष्ठित गाण्यांना विशेष आदरांजली वाहण्यात आली. तसंच निर्मात्या बारबरा ब्रोकोली आणि मायकल जी विल्सन यांचा सन्मान करण्यात आला.
-
Oscar Awards 2025 Live: ‘ड्युन: पार्ट 2’ला मिळाला बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा ऑस्कर पुरस्कार
बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा ऑस्कर पुरस्कारसुद्धा ‘ड्युन: पार्ट 2’ला मिळाला आहे. पॉल लॅम्बर्ट, स्टीफन जेम्स, रायस साल्कोम्बे आणि गर्ड नेफझर यांनी हा पुरस्कार पटकावला आहे.
-
Oscar Awards 2025 Live: ‘ड्युन: पार्ट 2’ने पटकावला बेस्ट साऊंडचा ऑस्कर पुरस्कार
गॅरेथ जॉन, रिचर्ड किंग, रॉन बार्टलेट आणि डग हेम्फिल यांनी ‘ड्युन: पार्ट 2’साठी बेस्ट साऊंडचा ऑस्कर पुरस्कार आपल्या नावे केला आहे.
As written! DUNE: PART TWO wins the Oscar for Best Sound. #Oscars pic.twitter.com/1E72Xjn6PF
— The Academy (@TheAcademy) March 3, 2025
-
Oscar Awards 2025 Live: ‘नो अदर लँड’ने पटकावला बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर फिल्मचा पुरस्कार
‘नो अदर लँड’ने बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे. बासेल ॲड्रा, रेचल सझोर, हमदान बल्लाल आणि युवल अब्राहम यांनी हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे.
-
Oscar Awards 2025 Live: बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार..
मॉली ओब्रायन आणि लिसा रेमिंग्टन यांनी ‘द ओन्ली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा’साठी बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.
THE ONLY GIRL IN THE ORCHESTRA wins the Oscar for Best Documentary Short Film. Congratulations! #Oscars pic.twitter.com/xJOlW2TTYb
— The Academy (@TheAcademy) March 3, 2025
-
Oscar Awards 2025 Live: ‘एल माल’ या गाण्याने पटकावला बेस्ट ओरिजिनल साँगचा ऑस्कर
‘एमिलिया पेरेझ’ या चित्रपटातील ‘एल माल’ या गाण्यासाठी क्लेमेंट ड्यूकोल, कॅमिल आणि जॅक ऑडियार्ड यांना बेस्ट ओरिजिनल साँगचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
-
Oscar Awards 2025 Live: ‘विकेड’ने पटकावला बेस्ट प्रॉडक्शन डिझाइनचा ऑस्कर पुरस्कार
नेथन क्राऊली आणि ली सँडेल्स यांना ‘विकेड’ या चित्रपटासाठी बेस्ट प्रॉडक्शन डिझाइनचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.
It’s all grand, and it’s all gold! Congratulations to the WICKED production design team for bringing the magic of Oz to life. #Oscars pic.twitter.com/qCRDJYMtoz
— The Academy (@TheAcademy) March 3, 2025
-
Oscar Awards 2025 Live: सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार..
‘एमिलिया पेरेझ’ या चित्रपटासाठी झो सलदानाने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.
-
Oscar Awards 2025 Live: बेस्ट फिल्म एडिटिंगचा ऑस्कर पुरस्कार..
‘अनोरा’ या चित्रपटासाठी शॉन बेकरने बेस्ट फिल्म एडिटिंगचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील हा त्याचा दुसरा पुरस्कार आहे. याआधी ‘अनोरा’साठीच बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्लेचा पुरस्कार त्याने आपल्या नावे केला आहे. शॉन बेकरला यंदा चार श्रेण्यांमध्ये नामांकनं मिळाली आहेत.
Sean Baker makes the final cut! Congratulations on the Oscar for Best Film Editing. #Oscars pic.twitter.com/h8lQa0psSu
— The Academy (@TheAcademy) March 3, 2025
-
Oscar Awards 2025 Live: ‘द सबस्टन्स’ने पटकावला बेस्ट मेकअप आणि हेअरस्टायलिंगचा पुरस्कार
पियरे-ऑलिव्हियर पर्सिन, स्टेफनी गिलॉन आणि मर्लिन स्कार्सेली यांनी ‘द सबस्टन्स’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टायलिंगचा पुरस्कार आपल्या नावे केला आहे.
It’s time to pump it up! THE SUBSTANCE wins the Oscar for Best Makeup and Hairstyling. #Oscars pic.twitter.com/hni3Wk21RP
— The Academy (@TheAcademy) March 3, 2025
-
Oscar Awards 2025 Live: बेस्ट अडाप्टेड स्क्रीनप्लेचा ऑस्कर पुरस्कार…
‘कॉनक्लेव्ह’ या चित्रपटासाठी पीटर स्ट्रॉघनने बेस्ट अडाप्टेड स्क्रीनप्लेचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.
White smoke from the chapel chimney — it’s been decided: CONCLAVE wins the Oscar for Best Adapted Screenplay. #Oscars pic.twitter.com/RUxike1NUg
— The Academy (@TheAcademy) March 3, 2025
-
Oscar Awards 2025 Live: ‘अनोरा’साठी शॉन बेकरला मिळाला बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्लेचा ऑस्कर
सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा या श्रेणीत शॉन बेकरने ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. ‘अनोरा’ या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
-
Oscar Awards 2025 Live: बेस्ट कॉस्च्युम डिझाइन पुरस्काराची घोषणा
‘विकेड’ या चित्रपटासाठी पॉल टेझवेलने बेस्ट कॉस्च्युम डिझाइनचा पुरस्कार पटकावला.
Paul Tazewell will help you be popular!
Congratulations on winning the Oscar for Best Costume Design. #Oscars pic.twitter.com/nknkPvoeBN
— The Academy (@TheAcademy) March 3, 2025
-
Oscar Awards 2025 Live: सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार..
किअरन कल्किनला ‘द रिअल पेन’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
-
Oscar Awards 2025 Live: ‘फ्लो’ ठरला बेस्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म
बेस्ट अॅनिमेटेड फीचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार गिंट्स झिलबालोडिस यांच्या ‘फ्लो’ने पटकावला
-
Oscar Awards 2025 Live: बेस्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म
बेस्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्मचा ऑस्कर ‘इन द शॅडो ऑफ द सायप्रेस’साठी शिरीन सोहानी आणि हुसेन मोलायेमी यांना मिळाला.
The Oscar for Best Animated Short Film goes to Shirin Sohani and Hossein Molayemi for IN THE SHADOW OF THE CYPRESS! #Oscars pic.twitter.com/0ctJ5SaIqE
— The Academy (@TheAcademy) March 3, 2025
-
Oscar Awards 2025 Live: हॅले बेरी-अॅड्रियन ब्रॉडी यांच्याकडून वादग्रस्त ऑस्कर किस पुन्हा रिक्रिएट
22 वर्षांनंतर हॅले बेरी आणि अॅड्रियन ब्रॉडी यांनी रेड कार्पेटवर वादग्रस्त ऑस्कर किस पुन्हा रिक्रिएट केला. 2003 मध्ये बेरीने अॅड्रियनला विजेता घोषित केलं होतं. त्यानंतर त्याने आई आणि फोटोग्राफरला मिठी मारल्यानंतर स्टेजवर उभ्या असलेल्या बेरीच्या ओठांवर किस केलं. यानंतर बेरी बरीच गोंधळलेली पहायला मिळाली होती. ही गोष्ट त्यावेळी खूप चर्चेत होती. आता 22 वर्षानंतर त्यांनी हाच किस पुन्हा रिक्रिएट केला.
A reunion 22 years in the making. #Oscars pic.twitter.com/MkaF2xb6SE
— The Academy (@TheAcademy) March 2, 2025
-
Oscar Awards 2025 Live: रेड कार्पेटवर कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज
व्हूपी गोल्डबर्ग, एड्रियन ब्रॉडी, जॉर्जिना चॅपमन, एमा स्टोन आणि एमी पोहलर यांनी रेड कार्पेटवर चाहत्यांसोबत फोटो काढला.
Whoopi Goldberg, Adrien Brody, Georgina Chapman, Emma Stone and Amy Poehler with fans on the 97th #Oscars red carpet.
Photo Credit: John Shearer pic.twitter.com/2tL8NX9ZUU
— The Academy (@TheAcademy) March 3, 2025
-
Oscar Awards 2025 Live: ऑस्करचं लाइव्ह स्ट्रीमिंग
पहिल्यांदाच ‘ऑस्कर 2025’चं लाइव्ह स्ट्रीमिंग Hulu, YouTube TV, AT&T TV आणि FuboTV वर पाहता येईल.
-
Oscar Awards 2025 Live: भारताला प्रियांका चोप्राच्या लघुपटाकडून अपेक्षा
गुनीत मोंगा, प्रियांका चोप्रा आणि मिंडी कलिंग यांच्या ‘अनुजा’ या लघुपटाने ऑस्करच्या नामांकनात स्थान मिळवळं असलं तरी याशिवाय इतर कोणताही भारतीय चित्रपट शर्यतीत नाही. ‘लापता लेडीज’, ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ यांसारख्या चित्रपटांना नामांकनातून वगळण्यात आलंय.
-
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी कोणाला मिळाली नामांकनं
सिंथिया एरिव्हो, विकेड
कार्ला सोफिया गॅस्कॉन, एमिलिया पेरेझ
मिकी मॅडिसन, अनोरा
डेमी मूरे, द सबस्टन्स
फर्नांडा टोरेस, आय ॲम स्टिल हियर
-
Oscar Awards 2025 Live: सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीतील नामांकनं
एड्रियन ब्रॉडी, द ब्रुटलिस्ट
टिमोथी चालमेट, अ कम्प्लीट अननोन
कोलमॅन डोमिंगो, सिंग सिंग
राल्फ फिएनेस, कॉन्क्लेव
सेबेस्टियन स्टेन, द अप्रेंटिस
-
Oscar Awards 2025 Live: सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीतील नामांकनं
शॉन बेकर, अनोरा
ब्रॅडी कॉर्बेट, द ब्रुटलिस्ट
कोराली फार्गेट, द सबस्टन्स
जॅक्स ऑडियार्ड, एमिलिया पेरेज
जेम्स मँगोल्ड, ए कम्प्लीट अननोन
-
Oscar Awards 2025 Live: ‘ऑस्कर अवॉर्ड्स 2025’ची नामांकनं
बेस्ट पिक्चर
अनोरा
द ब्रुटलिस्ट
ए कम्प्लीट अननोन
कॉन्क्लेव
ड्यून: पार्ट टू
एमिलिया पेरेज
आई एम स्टिल हियर
निकेल बॉइज
द सबस्टन्स
विकेड
-
Oscar Awards 2025 Live: ‘एमिलिया पेरेझ’ या म्युझिकल क्राइम चित्रपटाला 13 नामांकनं
स्पॅनिश भाषेतील ‘एमिलिया पेरेझ’ या म्युझिकल क्राइम चित्रपटाला 13 नामांकनं मिळाली आहेत. मात्र या चित्रपटातील कलाकाराकडून नुकतेच काहीआक्षेपार्ह ट्विट करण्यात आल्याने त्याचा पुरस्कार सोहळ्यावर काय परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
Oscar Awards 2025 Live: 23 विविध श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर होणार
यंदा 23 विविध श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर करण्यात येतील. कॉमेडियन कॉनन ओब्रायन या सोहळ्याचं सूत्रसंचालन करत असून अनेक प्रसिद्ध कलाकार या सोहळ्यात परफॉर्म करणार आहेत. अमेरिकन रॅपर-गायिका क्वीन लतिफाह, ब्रिटीश गायिका राये, दक्षिण कोरियातील प्रसिद्ध ‘ब्लॅकपिंक’ या ग्रुपमधील लिसा यांचा त्यात समावेश आहे.
Published On - Mar 03,2025 12:34 AM





