Raanbaazaar: अभिनेत्री माधुरी पवारच्या टक्कलची सोशल मीडियावर चर्चा

| Updated on: May 23, 2022 | 12:11 PM

राजकारणातील एक महत्वकांशी आणि करारी स्त्री ची भूमिका अभिनेत्री माधुरी पवार हीने यामध्ये चोख साकारली आहे. अलिकडच्या काळात ग्लॅमरस दुनियेत जिथे अभिनेत्री आपल्या लूकबद्दल इतक्या जागरूक असतात अशा वेळेस माधुरीने टक्कल करून भूमिका साकारणं हे खरंच वाखाण्याजोगे आहे.

Raanbaazaar: अभिनेत्री माधुरी पवारच्या टक्कलची सोशल मीडियावर चर्चा
Madhuri Pawar
Image Credit source: Instagram
Follow us on

प्रत्येक अभिनेत्रीला तिच्या करिअरमध्ये एकदा तरी ग्लॅमरस किंवा बोल्ड कॅरेक्टर करायची इच्छा असते. पण टक्कल करून प्रेक्षकांना काय वाटेल याची पर्वा न करता केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर ती भूमिका वठवण्याची हिंमत मोजक्याच अभिनेत्री करतात. हे मोठं शिवधनुष्य अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) हिने लीलया पेललं आहे. तिच्या पहिल्याच ‘रानबाजार’ (Raanbaazaar) या वेब सीरिज (Web series) मधून याची प्रचिती येते. कोणत्याही ‘स्टीरिओ टाईप’मध्ये न अडकता तिने तिच्या अभिनयाच नाणं खणखणीत वाजवलं आहे. राजकारणातील एक महत्वकांशी आणि करारी स्त्री ची भूमिका अभिनेत्री माधुरी पवार हीने यामध्ये चोख साकारली आहे. अलिकडच्या काळात ग्लॅमरस दुनियेत जिथे अभिनेत्री आपल्या लूकबद्दल इतक्या जागरूक असतात अशा वेळेस माधुरीने टक्कल करून भूमिका साकारणं हे खरंच वाखाण्याजोगे आहे.

नुकत्याच रिलीज झालेल्या ‘रानबाजार’ या वेब सीरिजमध्ये प्रेरणा सायाजीराव पाटील साने ही राजकीय स्त्री व्यक्तीरेखा माधुरीने साकारली आहे. वडिलांच्या निधनानंतर राजकीय वारसासाठी तिने केलेली खेळी, जनतेच्या मनात स्थान मिळविण्यासाठी वडिलांच्या निधनंतर तिने स्वतःचं केलेलं मुंडन अन् त्याच बाल्ड लूकमध्ये तिने पुढे सुरू ठेवलेला राजकीय प्रवास हा प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता वाढविणारा आहे. हनी ट्रॅप, राजकारण आणि त्यामध्ये प्रेरणाचं पुढचं पाऊल काय असेल, याची उत्कंठा प्रेक्षकांच्या मनात आता निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

आपल्या भूमिकेविषयी बोलताना माधुरी पवार म्हणाली, “अशी भूमिका मिळणं हे माझ्यासाठी अनपेक्षित होतं. पण ती माझ्या वाट्याला दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्यामुळे आली. या भूमिकेसाठी मी खूप मेहनत घेतली. राजकीय व्यक्तींना भेटले. त्यांच्या देहबोलीचा भाषेचा आभ्यास केला. राजकारणातील स्त्रियांवरील पुस्तकं वाचली. इतकंच नव्हे तर शिव्याही शिकले. व्यक्तिरेखेसाठी अक्षरशः शिव्या देण्याचीही प्रॅक्टिस केली. प्रेरणा सायाजीराव पाटील साने या भूमिकेमुळे माझी अभिनयाच्या भूक भागली आहे, असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.”