Little Little Song : ‘लिटील लिटील’ गाण्यात अक्षय-धनुषचा ‘अतरंगी’ अंदाजात धमाल डान्स, नवं गाणं पाहिलंत का?

बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar), धनुष (Dhanush) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांचा 'अतरंगी रे' (Atrangi Re) हा चित्रपट 24 डिसेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्याची एक एक गाणी रिलीज होत आहेत, ज्याचे संगीत प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांनी दिले आहे.

Little Little Song : ‘लिटील लिटील’ गाण्यात अक्षय-धनुषचा ‘अतरंगी’ अंदाजात धमाल डान्स, नवं गाणं पाहिलंत का?
Little Little Song
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 1:46 PM

मुंबई : बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar), धनुष (Dhanush) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांचा ‘अतरंगी रे’ (Atrangi Re) हा चित्रपट 24 डिसेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्याची एक एक गाणी रिलीज होत आहेत, ज्याचे संगीत प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांनी दिले आहे. आज म्हणजेच सोमवारी (20 डिसेंबर) या चित्रपटाचे आणखी एक गाणे रिलीज झाले आहे, ज्याचे नाव आहे – ‘लिटिल लिटल’.

गाण्याच्या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार आणि धनुष धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत. त्याचबरोबर सारा अली खानही या दोन अभिनेत्यांसोबत डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून असे दिसते की, हे एखाद्या बॉईज हॉस्टेलमध्ये चित्रित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, धनुष सारासोबत लग्न करतो. हे गाणे पाहून असे वाटते की, लग्नानंतर धनुष साराला या हॉस्टेलमध्ये घेऊन येतो.

युट्युबवर ‘लिटील लिटील’ गाण्याची हवा

एकूणच गाण्याबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे संगीत आणि त्याचे बोल लोकांचे लक्ष वेधून घेऊ शकतात, कारण हे गाणे कॉलेज लाइफचेही थोडेसे चित्रण करते. या गाण्याचे संगीत ए आर रहमान यांनी दिले असून, गाण्याचे बोल इर्शाद कामिल यांनी लिहिले आहेत. हे गाणे रिलीज होताच ते यूट्यूबवर व्हायरल झाले आहे. हे गाणे रिलीज होऊन फारच कमी कालावधी झाला असून, आतापर्यंत त्याला 2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावरून हे गाणे लोकांना खूप आवडत असल्याचे दिसून येते.

पाहा गाणे :

या चित्रपटाची आतापर्यंत तीन गाणी रिलीज झाली आहेत. सर्वप्रथम चित्रपटाचे ‘चका चक’हे गाणे रिलीज झाले, ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. यानंतर ‘रीत जरा सी’ आणि ‘गर्दा’ रिलीज झाले. चित्रपटाची टीम इव्हेंट्स आणि शोजच्या माध्यमातून चित्रपटाचे प्रमोशन तर करत आहेच, पण निर्माते गाण्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचा उत्साहही वाढवत आहेत.

आनंद एल राय दिग्दर्शित हा चित्रपट 24 डिसेंबर रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अक्षय, सारा आणि धनुष यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्याचबरोबर धनुषचा आनंद एल रायसोबतचा हा दुसरा चित्रपट आहे. दोघांनी यापूर्वी ‘रांझना’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

हेही वाचा :

Aishwarya Rai Bachchan | ‘बच्चन’ परिवार अडचणीत, ऐश्वर्या रायला ‘ईडी’चे समन्स! नेमकं प्रकरण काय?

Kajal Aggarwal | ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालकडे ‘गुड न्यूज’? नव्या फोटोंमुळे चर्चेला उधाण!

Bajrangi Bhaijaan 2 : ‘मुन्नी-बजरंगी’ची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, ‘बाहुबली’ दिग्दर्शकाचे वडील लिहिणार कथा!

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.