Binge Watch : ‘स्पायडर मॅन’पासून ते ‘पुष्पा’पर्यंत, आठवडाभर मनोरंजनाची धमाकेदार मेजवानी!

डिसेंबर महिना सुरू झाला आहे. आता हे वर्ष लवकरच आपला निरोप घेणार आहे. चित्रपटगृहांचे दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत आणि OTT प्लॅटफॉर्मवरही भरपूर चित्रपट-वेब सीरीज प्रदर्शित होत आहेत. हा वीकेंड तुमच्यासाठी मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहे. 'स्पायडर-मॅन : नो वे होम' आणि 'पुष्पा' या आठवड्यात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहेत.

Binge Watch : ‘स्पायडर मॅन’पासून ते ‘पुष्पा’पर्यंत, आठवडाभर मनोरंजनाची धमाकेदार मेजवानी!
Spider Man-Pushpa
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 8:00 AM

मुंबई : डिसेंबर महिना सुरू झाला आहे. आता हे वर्ष लवकरच आपला निरोप घेणार आहे. चित्रपटगृहांचे दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत आणि OTT प्लॅटफॉर्मवरही भरपूर चित्रपट-वेब सीरीज प्रदर्शित होत आहेत. हा वीकेंड तुमच्यासाठी मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहे. ‘स्पायडर-मॅन : नो वे होम’ आणि ‘पुष्पा’ या आठवड्यात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहेत.

जर, तुम्हाला थिएटरमध्ये जायचे नसेल तर, मजेदार वेब सीरीज पाहून मनोरंजन करू शकता. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कोणते चित्रपट आणि वेब सीरीज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याच्या तयारीत आहेत, हे जाणून घेऊया.

स्पायडर मॅन : नो वे होम

‘स्पायडर मॅन : नो वे होम’ या हॉलिवूड चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. रिलीजपूर्वीच याच्या ट्रेलरने धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट 16 डिसेंबरला भारतात प्रदर्शित होत आहे. मात्र त्याच्या आगाऊ बुकिंगमुळे वेगळाच दबदबा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर हा चित्रपट 17 डिसेंबरला अमेरिकेत प्रदर्शित होणार आहे.

पुष्पा

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या मोस्ट अवेटेड ‘पुष्पा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अल्लू अर्जुनसोबत या चित्रपटात रश्मिका मंदानाही मुख्य भूमिकेत आहे. ‘पुष्पा’च्या धमाकेदार ट्रेलरनंतर चाहते या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. हा चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

शवा ना गिरधारी लाल

‘शावा ना गिरधारी लाल’ हा पंजाबी कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट गायक अभिनेता गिप्पी ग्रेवालने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात हिमांशी खुराना, नीरू बाजवा आणि गिप्पी ग्रेवाल मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमही दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे यामी 10 वर्षांनंतर पंजाबी चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे. या चित्रपटात पंजाबी चित्रपटसृष्टीतील 52 कलाकार एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट 17 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

डिकपल

Decouple ही सीरीज 17 डिसेंबर रोजी Netflix वर रिलीज होणार आहे. या सीरीजमध्ये आर माधवन आणि सुरवीन चावला यांची जोडी एकत्र दिसणार आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनात काहीही सुरळीत चाललेले नाही आणि त्यांना एकमेकांपासून घटस्फोट घ्यायचा आहे. दोघांनाही एक मुलगी आहे, जी तिच्या पालकांच्या या निर्णयावर खूश नाही आणि तिचे पालक पुन्हा एकदा एकत्र यावे अशी तिची इच्छा आहे. या त्रिकोणी कुटुंबाची कथा सीरीजमध्ये दाखवण्यात आली आहे.

हेही वाचा :

Janhvi Kapoor | ‘सोने का रंग है, शीशे का अंग है…’, जान्हवीच्या हॉट अदांनी सोशल मीडियावर आग!

Ileana D’Cruz | इलियानाचा बिकिनी अवतार, मालदीवच्या समुद्रकिनारी लुटतेय सनबाथचा आनंद!

20 Years Of KKKG | करण जोहरच्या ‘कभी ख़ुशी कभी गम’ला 20 वर्ष पूर्ण! चित्रपटाबद्दलच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

Case Against Samantha | प्रदर्शनाआधीच ‘पुष्पा’ वादात, समंथाविरोधात गुन्हा दाखल! नेमकं प्रकरण काय?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.