कधीकाळी रस्त्यावर वडापाव विकणारी चंद्रिका कशी पोहोचली बिग बॉसमध्ये?

Viral Vadapav Girl Chandrika Gera Dixit in Bigg Boss OTT 3 : बिग बॉसचा तिसरा सिझन उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनमध्ये दिल्लीची व्हायरल वडापाव गर्लदेखील दिसणार आहे. सामान्य घरातील चंद्रिका कशी पोहोचली बिग बॉसच्या घरात? वाचा सविस्तर...

कधीकाळी रस्त्यावर वडापाव विकणारी चंद्रिका कशी पोहोचली बिग बॉसमध्ये?
वडापाव गर्ल चंद्रिका गेरा दीक्षितImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 20, 2024 | 6:20 PM

बिग बॉस ओटीटीचा तिसरा सिझन उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिझनमध्ये वेगवेगळे स्पर्धक पाहायला मिळतील. या सगळ्यामध्ये चर्चेत आहे ती दिल्लीची वडापाव गर्ल चंद्रिका गेला दीक्षित… बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सिझनमधल्या पहिल्या स्पर्धकाचं नाव जाहीर झालं आहे. दिल्लीची वडापाव गर्ल आता बिग बॉस ओटीटी सिझन 3 मध्ये पाहायला मिळणार आहे. कधीकाळी रस्त्यावर वडापाव विकणारी चंद्रिका गेरा दीक्षित बिग बॉस ओटीटीमध्ये कशी पोहोचली? तिचा प्रवास कसा राहिला आहे? बिग बॉस ओटीटी सिझन 3 चा पहिला प्रोमो कसा आहे?

चंद्रिका मूळची मध्यप्रदेशची… लग्नानंतर ती दिल्लीत राहायला लागली. तिचा लहान मुलगा आजारी पडल्याने तिने तिची नोकरी सोडली. कुटुंब चालवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून तिने वडापावचा गाडा सुरु केला. यातून मिळणाऱ्या पैशांवर चंद्रिकाचं घर चालू लागलं.

चंद्रिका कशी बनली ‘वडापाव गर्ल’?

दिल्लीत वडापाव विकणारी चंद्रिका सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह आहे. वडापाव विकतानाचे व्हीडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले. काही यूट्युबर्सने तिच्यावर व्लॉग शूट केले. यातलं तिचं बोलणं नेटकऱ्यांना आवडू लागलं. तिचे व्हीडिओ व्हायरल होऊ लागले. इन्स्टग्रामवर तिच्या रिल्सला मिलियनमध्ये व्ह्यूज मिळू लागले. त्यानंतर तिची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होऊ लागली. मग अनेक यूट्यूबर्सने तिच्या मुलाखती घेतल्या अन् दिल्लीच्या रस्त्यावर वडापाव विकणारी चंद्रिका झाली प्रसिद्ध ‘वडापाव गर्ल’…

व्हायरल वडापाव गर्ल ते बिग बॉस ओटीटीची स्पर्धक

चंद्रिकाकडे वडापाव खाण्यासाठी लोक रांगा लावतात. आधी हातगाड्यावर वडापाव विकणारी चंद्रिकाने आता स्वत:चं दुकान सुरु केलं आहे. आता इथेही लोक येऊन वडापाव खातात. त्यानंतर आता चंद्रिका आणि अमनदीप सिंह यांचं गाणंही रिलीज झालं. या दोघांच्या दर्जी या गाण्याला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. त्यानंतर आता चंद्रिकाने आणखी एक टप्पा गाठला आहे. आता ती बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सिझनमध्ये दिसणार आहे. बिग बॉसच्या घरातील चंद्रिकाचा पहिला प्रोमोदेखील रिलीज झाला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.