गाडी घेतल्यानंतर धमक्यांचे फोन, एवढे पैसे आले कुठून?, यूट्यूबर गणेश आणि योगिता शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण
शिंदे कुटुंबाने नुकतीच एक कार खरेदी केली आहे. त्यावर अनेकांनी कमेंट करून एवढे पैसे कुठून आले असा प्रश्न विचारला. इतकंच नाही तर त्यांना धमकीचे फोनही येऊ लागले आहेत. त्यावर शिंदे कुटुंबाने एक व्हीडिओ पोस्ट करत आपल्याकडे एवढे पैसे आले कुठून यांचं स्पष्टीकरण दिलं आहे.
आयेशा सय्यद, मुंबई : सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण प्रसिद्ध होत आहेत. अनेकांना सोशल मीडियाने स्टार केलं आहे. असंच एक जोडपं आणि त्यांची चिमुकली तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल. त्यांचे अनेक फॉलोव्हर्स आहेत. गणेश शिंदे (Gansesh Shinde), योगिता शिंदे (Yogita Shinde) आणि शिवानी शिंदे (Shivani Shinde) यांचे फेसबुक आणि युट्यूब व्हीडिओ तुम्ही पाहिले असतील.त्यांचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या व्हीडिओंना मिलियनमध्ये व्ह्यूज मिळतात. त्यांचा साधेपणा, साधं राहणं हीच त्यांच्या व्हीडिओची खासियत आहे. पण सध्या या सगळ्यांवर एक संकट आलंय. ते आहे धमकीच्या फोनचं. शिंदे कुटुंबाने नुकतीच एक कार खरेदी केली आहे. त्यावर अनेकांनी कमेंट करून एवढे पैसे कुठून आले असा प्रश्न विचारला. इतकंच नाही तर त्यांना धमकीचे फोनही येऊ लागले आहेत. त्यावर शिंदे कुटुंबाने एक व्हीडिओ पोस्ट करत आपल्याकडे एवढे पैसे आले कुठून यांचं स्पष्टीकरण दिलं आहे.
शिंदे कुटुंबाला धमकीचे फोन
गणेश शिंदे, योगिता शिंदे आणि शिवानी शिंदे यांचे फेसबुक आणि युट्यूब व्हीडिओ तुम्ही पाहिले असतील.त्यांचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या व्हीडिओंना मिलियनमध्ये व्ह्यूज मिळतात. त्यांचा साधेपणा, साधं राहणं हीच त्यांच्या व्हीडिओची खासियत आहे. पण सध्या या सगळ्यांवर एक संकट आलंय. ते आहे धमकीच्या फोनचं. शिंदे कुटुंबाने नुकतीच एक कार खरेदी केली आहे. त्यावर अनेकांनी कमेंट करून एवढे पैसे कुठून आले?, असा प्रश्न विचारला. इतकंच नाही तर त्यांना धमकीचे फोनही येऊ लागले आहेत.
View this post on Instagram
शिंदे कुटुंबाचं स्पष्टीकरण
अनेकांनी कमेंट करून कमावलेल्या पैश्यांबद्दल विचारल्यानंतर शिंदे कुटुंबाने एक व्हीडिओ पोस्ट करत आपल्याकडे एवढे पैसे कुठून आले यांचं स्पष्टीकरण दिलं आहे. युट्यूबवरून हे पैसे कमावले असल्याचं गणेश शिंदे यांनी सांगितलं आहे. कारमधूनच त्यांनी हा व्हीडिओ शूट केला आहे आणि या सगळ्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
“युट्यूब व्हीडिओला मिळणाऱ्या व्ह्यूजमधून आणि जाहिरातींमधून आम्ही हे पैसे कमावले. तसंच आम्हाला काही कार्यक्रमांनाही बोलावलं जातं. त्यातूनही पैसे मिळतात ते पैसे साठवून त्यातून आम्ही कार घेतली आहे”, असं गणेश आणि योगिता शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
संबंधित बातम्या