खुशखबर! अवघ्या 149 रुपयात Netflix वर महिनाभर लुटा वेबसीरिज-चित्रपटांचा आनंद , जाणून घ्या काय नव्या प्लॅनबद्दल…

Netflix Cheap Plans : OTT च्या जमान्यातील अग्रगण्य नाव असणाऱ्या Netflixच्या सर्वात स्वस्त प्लॅनबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या आवडीचे चित्रपट, वेबसीरिज या प्लॅटफॉर्मवर पाहता येतात.

खुशखबर! अवघ्या  149 रुपयात Netflix वर महिनाभर लुटा वेबसीरिज-चित्रपटांचा आनंद , जाणून घ्या काय नव्या प्लॅनबद्दल...
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 7:39 PM

मुंबई : शनिवार-रविवारी घरी मस्त आराम करत, आवडीचा चित्रपट किंवा वेबसीरिज पाहण्याची मजाच काही वेगळी असते. नवा वा जुना कोणताही चित्रपट असो किंवा वेबसीरिज , नेटफ्लिक्सवर (Netflix)सगळं पहायला मिळतं. नेटफ्लिक्स सध्याच्या काळातील आघाडीचे व्हिडीओ स्ट्रीमिंग ॲप आहे. मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीवर नेटफ्लिक्सच्या माध्यमातून आपल्या आवडीचे व्हिडीओज् (Videos)पहायला मिळत असल्याने अल्पकाळातच ते सर्वांच्या आवडीचे ॲप झाले आहे. लहान मुलांसाठीच्या चित्रपटांपासून मोठ्यांना आवडतील असे जगभरातील विविध भाषेतील चित्रपट, वेगवेगळ्या विषयांवरच्या उत्कंठावर्धक वेबसीरिज, असा खजाना नेटफ्लिक्सवर सापडतो. मात्र बऱ्याच जणांना त्यांचे प्लॅन खूप महाग वाटतात. पण आज आम्ही तुम्हाला नेटफ्लिक्सच्या अशा एका प्लॅनची (Netflix Plan)माहिती देणार आहोत, ज्यामुळे अगदी कमी पैशांत तुम्ही महिनाभर नेटफ्लिक्सवरील विविध भाषांतील चित्रपट, वेबसीरिजचा मनमुराद आनंद लुटू शकाल. नेटफ्लिक्सचा हा सबस्क्रिप्शन प्लॅन अवघ्या 149 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. या प्रीपेड प्लॅनमुळे केवळ शनिवार-रविवार नाही, तर संपूर्ण महिना तुमचे मनोरंजन होईल. नेटफ्लिक्सचा हा सबस्क्रिप्शन प्लॅन असून तो कोणीही युझर ॲक्सेस करू शकतो.

Netflix चा सर्वात स्वस्त प्लॅन

खरंतर, नेटफ्लिक्सवर लिस्टेड मोबाइल प्लॅनची किंमत 149 रुपये इतकी आहे. त्यामध्ये युझर्सना स्टॅंडर्ड पिक्चर क्वॉलिटी (480 पिक्सेल) पाहायला मिळते. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याचा वापर फक्त मोबाईल आणि टॅबवर केला जाऊ शकतो. म्हणजे नेटफ्लिक्सचा हा प्लॅन घेतलात तर तुम्ही केवळ तुमचा मोबाईल अथवा टॅब यावरूनच नेटफ्लिक्स ॲक्सेस करू शकाल. कॉम्प्युटर किंवा टीव्हीवर त्याचा वापर करता येणार नाही. मात्र 199 रुपयांच्या प्लॅनमुळे मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि टॅबवरून नेटफ्लिक्स ऑपरेट करता येऊ शकते. पण ते एका वेळेस एकाच टीव्हीवरुन अथवा एकाच स्क्रीनवरून ॲक्सेस करता येते.

हे सुद्धा वाचा

Netflixआणखी स्वस्त प्लॅन आणण्याच्या तयारीत

नेटफ्लिक्स प्रमाणेच इतर ओटीटी (OTT)प्लॅटफॉर्म्सची संख्या वाढत असून नेटफ्लिक्सचे युझर्स इतर ठिकाणी विखरत आहे. घटत्या युझरसंख्येला आळा घालण्यासाठी नेटफ्लिक्सने अनेक कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. जाहिरातींसह अनेक स्वस्त प्लॅन नेटफ्लिक्स घेऊन येणार असल्याची माहिती मिळत आहे. टीव्ही आणि मोबाईल साठी सध्या सर्वात स्वस्त प्लॅन 199 रुपयांचा आहे. मात्र याहून अधिक स्वस्त प्लॅन लवकरच येतील अशी महिती समोर येत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.