Lockupp Show Winner Munawar Faruqui : मुनव्वर फारुकी ठरला ‘लॉकअप’चा विजेता, ट्रॉफी, रोख रक्कम, वाद आणि बरंच काही…

'लॉक अप' या शोचा विजेता मुनावर फारुकीला विजेतेपदाची ट्रॉफी मिळाली आहे. शिवाय 20 लाख रुपये देण्यात आलेत. यासोबतच त्याला एक चमचमीत आलिशान कारही मिळाली आहे.

Lockupp Show Winner Munawar Faruqui : मुनव्वर फारुकी ठरला 'लॉकअप'चा विजेता, ट्रॉफी, रोख रक्कम, वाद आणि बरंच काही...
मुनव्वर फारुकी
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 10:04 AM

मुंबई : कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोच्या पहिल्या सीझनचा विजेता (Lockupp Show Winner) ठरला आहे. मुनव्वर फारुकी याने सर्वाधिक मतं मिळवत हा बहुमान आपल्या नावे केला. त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. तो सुरुवातीपासूनच या शोमध्ये तगडा स्पर्धक राहिला आहे. कंगना रनौतच्या या लॉकअप शोमध्ये 70 दिवस हे सगळे स्पर्धक होते. याचा आता निकाल समोर आला आहे. मुनव्वर या स्पर्धेचा विजेता ठरला आहे. अंजली अरोरा, पायल रोहतगी आणि मुनव्वर फारुकी हे तीन टॉप 3 स्पर्धक होते.

मुनव्वर फारुकी विजेता

कॉमेडियन मुनव्वर फारुकी ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोच्या पहिल्या सीझनचा विजेता ठरला आहे. मुनव्वर फारुकी याने सर्वाधिक मतं मिळवत हा बहुमान आपल्या नावे केला. त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘लॉकअप’ हा बहुचर्चित शो 27 फेब्रुवारीला सुरु झाला. या शो मध्ये 20 स्पर्धक होते. यात शिवम शर्मा, पायल रोहतगी, आझम फलाह, मुनव्वर फारुकी, अंजली अरोरा आणि प्रिन्स नरुला यासारख्या अनेक कलाकार होते. अखेर याचा निकाल समोर आला. मुनव्वर विजेता ठरलाय.

View this post on Instagram

A post shared by Erk❤️rek (@ektarkapoor)

ट्रॉफी आणि रोख रक्कम

‘लॉक अप’ या शोचा विजेता मुनावर फारुकीला विजेतेपदाची ट्रॉफी मिळाली आहे. शिवाय 20 लाख रुपये देण्यात आलेत. यासोबतच त्याला एक चमचमीत आलिशान कारही मिळाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Erk❤️rek (@ektarkapoor)

शो जिंकल्यानंतर मुनव्वरने आपल्या चाहत्यांचे आभार मानलेत. मुनव्वर म्हणाला की, “मला वाटायचं की मी ही स्पर्धा जिंकावी. त्याचसाठी मी इथे आलो होतो. पण फिनाले जवळ आला तसतशी धाकधुक वाढू लागली… दोन दिवस मी झोपलो देखील नाही. मी घाबरलो होतो. पण आता मस्त वाटतंय. मला मत देणाऱ्यांचे मनापासून आभार तुमच्यामुळे ही ट्रॉफी माझ्याकडे आली.”

मुनव्वर फारुकी आणि वाद

मुनव्वर हा कॉमेडियन आहे. तो त्याचे काही कार्यक्रमही करतो. गुजरातला त्याचा कार्यक्रम होता. त्याआधीच्या कार्यक्रमात त्याने बजरंग दलाला उद्देशून काही टिपण्णी केल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्यामुळे त्याचा गुजरातमधला कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका बजरंग दलाने घेतली होती. त्यानंतर खूप वादही निर्माण झाला होता. त्याच्या कार्यक्रमातून तो द्वेष पसरवत असल्याचा आरोप कायम लावला जातो. त्याच्या अनेक कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी याआधी करण्यात आली आहे. तो लॉकअप शोमध्ये देखील तसाच बिन्धास्त अंदाजात पाहायला मिळाला.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.