‘रक्तांचल-2’ला प्रेक्षकांकडून भव्य प्रतिसाद, समांतर-नक्सलबारीच्या यशानंतर ‘जीसिम्स’ची नवी निर्मिती

‘समांतर’ भाग 1 आणि 2 या सिरीज एमएक्सप्लेयरवर प्रचंड गाजल्या आणि ‘नक्सलबारी’ या झी-5 वरची सिरीजचीही चांगलीच चर्चा झाली. गेल्या दोन वर्षांमध्ये या दोन गाजलेल्या वेब सिरीजच्या यशानंतर ‘जीसिम्स’ने आपली नवीन वेबसिरीज ‘रक्तांचल’चा दुसरा भाग आणला आहे

‘रक्तांचल-2’ला प्रेक्षकांकडून भव्य प्रतिसाद, समांतर-नक्सलबारीच्या यशानंतर ‘जीसिम्स’ची नवी निर्मिती
‘रक्तांचल’2-वेबसिरीज
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 5:02 PM

मुंबई : समांतर(Samantar) भाग 1 आणि 2 या सिरीज एमएक्सप्लेयरवर (MX Player) प्रचंड गाजल्या आणि ‘नक्सलबारी’ (Naxalbari) या झी-5 (Zee-5) वरची सिरीजचीही चांगलीच चर्चा झाली. गेल्या दोन वर्षांमध्ये या दोन गाजलेल्या वेब सिरीजच्या यशानंतर ‘जीसिम्स’ने आपली नवीन वेबसिरीज ‘रक्तांचल’ (Raktanchal) चा दुसरा भाग आणला आहे. एमएक्सप्लेयरवरील या मालिकेला रसिकांकडून फार मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांची निर्मिती असलेल्या या वेब सिरीजचे दिग्दर्शन रितम श्रीवास्तव यांनी केले आहे.वेब सिरीजचे स्ट्रीमिंग अर्थात प्रक्षेपण सुरु झाल्यापासून या सिरीजने प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. करण पटेल (Karan Patel), माही गिल (Mahi Gill), क्रांती प्रकाश झा (Kranti Prakash Jha), निकीतीन धीर (Nikitin Dhir), आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांच्या प्रमुख भूमिका ‘रक्तांचल’मध्ये आहेत. 11 फेब्रुवारीला एमएक्स प्लेयरवर या सिरीजचा प्रीमियर सुरू झाला. तेव्हापासूनच या सिरीजची चांगलीच चर्चा आहे.

‘रक्तांचल’ या नवीन मालिकेबद्दल बोलताना अर्जुन आणि कार्तिक म्हणाले, “ज्या पद्धतीने ही मालिका आकाराला आली आहे त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. रसिकांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. केवळ दोन वर्षांच्या कालावधीत आम्ही एमएक्स प्लेयरबरोबर तिसऱ्यांदा जोडले जात आहोत. पुढेही आम्ही त्यांच्यासाठी अनेक मालिकांची निर्मिती करू.” दिग्दर्शक रितम श्रीवास्तव यांच्याबाबत बोलताना म्हणाले की,“रितम हे कामाच्या बाबतीत झपाटलेले आहेत, सर्जनशील आहेत आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत ते जातीने लक्ष घालतात. ते जे काही करतात त्यात त्यांचे मन आणि हृदय छोकून देत ते काम करतात.”

‘रक्तांचल’या हिंदी वेब सिरीजचे दुसरे पर्व सध्या एमएक्स प्लेयरवर सुरु असून ते एक क्राइम नाट्य आहे. पूर्वांचल, उत्तर प्रदेशात १९८०च्या दशकात जी गुन्हेगारी चालायची त्यावर आधारित ही मलिका आहे. ही तत्कालीन सरकारी कामांच्या निविदांमध्ये जी गुन्हेगारी चालायची त्यावर आधारित अशी वेब सिरीज आहे. वासिम खानच्या गुन्हेगारी जगताची ही कथा असून त्याच्या या गुन्हेगारीला युवा गुन्हेगार विजय सिंग आव्हान देतो आणि त्यावेळी कथेला एक वेगळे वळण लागते. वासिम हा एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा गुन्हेगार असला तरी विजय हा मनाने चांगला आहे आणि लोकांना जेवढी म्हणून मदत करता येईल तेवढी करता असतो. मात्र परिस्थिती त्याला गुन्हेगारी विश्वात ढकलते.

कथा जसजशी पुढे सरकते तसतशी निविदांसाठी चाललेली ही लढाई अधिक तीव्र होत जाते आणि त्यापार्श्वभूमीवर राजकारणही आपली भूमिका बजावत असते. त्यातून मग पूर्वांचलमध्ये रक्तरंजीत घटना घडत राहतात. विजय आपले अस्तित्व स्थापित करण्यासाठी खूप काही करतो आणि शेवटी निविदांचा बादशाह बनतो.

या वेब सिरीजच्या पहिल्या पर्वामध्ये विजय सिंग (क्रांती प्रकाश झा) जरी वसीम खानबरोबरची (निकीतीन धीर) जरी शेवटची लढाई हरत असला तरी उत्तर प्रदेशातील गुंधेगारी टोळ्यांचे काम काही अजून संपलेले नसते. त्यांच्याकुकर्मांचे खोदकाम सुरूच असते. त्याला गती मिळते ती मुंबई पोलिसांचे एक पथक त्यांच्यापर्यंत पोहोचते तेव्हा. त्यानंतर या सर्व घटनांना अधिक गंभीर वळण प्राप्त होते. त्यातून मग या सर्व गुंड टोळ्यांच्या कक्षा अधिक विस्तृत होतात. त्या कशामुळे, हे पाहणे अधिक रंजक ठरते. ‘रक्तांचल’चे हे दुसरे पर्व हे राजकारणावर सत्तेने मिळविलेल्या प्रभूत्त्वाची आणि त्यापलीकडील गोष्टींची कथा आहे.

संबंधित बातम्या

Jhund Song: लफडा झाला वाकडा तिकडा, नागराजच्या झूंडचं दुसरं गाणं रिलिज, झिंगाटपेक्षा भारी?

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर विवाहबद्ध, लग्नाला सेलिब्रिटींची हजेरी

शिवराय साकारणाऱ्या अभिनेत्यांकडून महाराजांना अनोखी मानवंदना, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.