सुरतेच्या लुटीची अवाक करणारा ‘शोध’ कादंबरी स्टोरीटेलवर, उपेंद्र लिमये आणि केतकी थत्तेच्या आवाजात…

मुरलीधर खैरनार लिखित 'शोध' या विलक्षण लोकप्रिय ठरलेल्या कादंबरीतून अभिनेते उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री केतकी थत्ते यांच्या जबरदस्त दमदार आवाजात स्टोरीटेल मराठी खास इतिहास-साहित्यप्रेमींसाठी घेऊन येत आहे.

सुरतेच्या लुटीची अवाक करणारा 'शोध' कादंबरी स्टोरीटेलवर, उपेंद्र लिमये आणि केतकी थत्तेच्या आवाजात...
सुरतेच्या लुटीची अवाक करणारा 'शोध' कादंबरी स्टोरीटेलवरImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 8:20 AM

मुंबई : श्वास रोखून धरायला लावणारं रहस्य, उत्कंठेचं टोक गाठायला लावणारा वेगवान घटनाक्रम, बुध्दिमत्ता, कूटनीती आणि धाडस यांच्या जोरावर बहात्तर तास चाललेला हा रोमांचक अद्भुत थरार… मुरलीधर खैरनार लिखित ‘शोध’ (Shodh) या विलक्षण लोकप्रिय ठरलेल्या कादंबरीतून अभिनेते उपेंद्र लिमये (Upendra limaye) आणि अभिनेत्री केतकी थत्ते (ketaki Thatte) यांच्या जबरदस्त दमदार आवाजात स्टोरीटेल मराठी खास इतिहास-साहित्यप्रेमींसाठी घेऊन येत आहे. खजिन्याचा शोध घेणारी थरारक कथा लेखकाने आपल्या भावविश्वातून उभी केली आहे.. कथा रंगवताना शिवकालीन अस्सल नोंदी, दस्तावेज याचा पुरेपूर उपयोग लेखकाने भौगोलिक भान ठेवून केला आहे.. मुंबई, नाशिक आणि सप्तश्रृंग पर्वतरांगेतील ठिकाणे लेखक आपल्या लेखणीने वाचकांसमोर जिवंत करतो.. कथेची उत्कृष्ठ मांडणी, वेगवान कथानक, लेखणीतून जिवंत केलेले प्रसंग, श्वास रोखून धरायला लावणारा सस्पेन्स अभिनेता उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री केतकी थत्ते यांचा जबरदस्त दमदार श्राव्यभिनायाने नटलेली तुफान लोकप्रिय ‘शोध’ची उत्कंठा स्टोरीटेल मराठीवर ऐकता येईल.

ही गोष्ट सुरू होते 1670 साली शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली, तेव्हा. पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना या लुटीतला प्रचंड ऐवज हरपला! कुठे गडप झाला हा खजिना? काय रहस्य दडलं होतं त्या खजिन्यात? ही एक घटना आणि तो परत मिळविण्यासाठी वर्तमान काळातील दोन प्रकृतींमधला संघर्ष. हा खजिना कुठे आहे हे सांगणारा निरोप महाराजांना देणारा गोंदाजी. मुघलांच्या ताब्यात सापडल्यानंतर त्याचा झालेला गूढ मृत्यू. खजिन्याच्या शोधाविषयी सारे संभ्रमित असणे. खजिना शोधण्यासाठी अनेक पर्यायांचा वापर, खलिता मिळवणं, त्यातील सांकेतिक भाषेचा वेध, यात दोन्ही गटाचं द्वंद्व. खजिन्याच्या माहितीसाठी आसुसलेले इतिहासप्रेमी आणि संपत्ती मिळविण्यासाठी हव्यास असलेल्या काही शक्ती… असं हे कथानक स्टोरीटेलवर ऐकताना रसिकाला शोधयात्रेचा, रहस्यमयतेचा दमदार अनुभव देतं. गुंतवून टाकणाऱ्या इतिहास, वर्तमान, मानवी वृत्ती-प्रवृत्ती, आधुनिक माहिती तंत्रज्ञान सामाजिक-राजकीय परिस्थिती यांची सांगड प्रभावीपणे घालत कमालीचे कुतूहल तयार करते.

अभिनेता उपेंद्र लिमये या कादंबरी विषयी बोलताना म्हणाले, “किशोर कदम, सचिन खेडेकर, सयाजी शिंदे असे काही माझे समविचारी मित्र जेव्हा आम्ही एखादं नवं काही ऐकतात, वाचतात तेव्हा लगेच एकमेकांना सांगतो, सुचवतो. त्या संदर्भानुसार मी ही मुरलीधर खैरनारांची अफलातून कादंबरी वाचली. सलग दीड दोन दिवसात मी ती पूर्ण केली, तिने मला झपाटून टाकल. अश्या काही मोजक्या कादंबऱ्या असतात त्यातलीच ही एक खूप दुर्मिळ कादंबरी आहे, जी तुमची झोप उडवते आणि तुम्हाला गुंतवून ठेवते. अतिशय सकस कथाबीज आणि सुबक मांडणीमुळे स्टोरीटेलवर ऑडिओ रूपात सादर करताना जसा मी भारावून गेलो तसंच तुम्ही ऐकताना गुंतून जाणार हे नक्की”. तर अभिनेत्री केतकी थत्ते म्हणाल्या “मीही ही कादंबरी अहोरात्र सलग तीन दिवसात वाचून काढली. एकदा हातात धरली कि संपल्याशिवाय चैन पडत नाही. आपण तहान भूक सगळं हरपून कादंबरीत गुंतून जातो. लेखक मुरलीधर खैरनार यांच्या लेखणीची ही किमया आहे. या शोधाच्या मोहिमेतील आपणही एक होतो आणि त्यातील पात्रांसोबत वावरू लागतो. स्टोरीटेल कादंबऱ्यांची निवड युनिव्हर्सल विचार करून करते. सर्वांनी नक्की ऐकावी अशी अप्रतिम कलाकृती आहे.”

संबंधित बातम्या

राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटण-पाटील यांच्या चित्रपटात प्रिती मल्लापूरकर

Gadad Movie Poster launch : ‘गडद’चं मोशन पोस्टर लाँच, अंडरवॉटर शूट होणारा पहिला मराठी सिनेमा

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट आहे का? नव्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी उपस्थित केला प्रश्न

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.