शून्यातून यूट्यूब सेलिब्रिटी होण्यापर्यंतचा प्रवास… Ganesh Shinde आणि Yogita Shinde यांनी उलगडला, सहज- साधा पण प्रेरणादायक…

इतक्या साधेपणानं राहणारं हे जोडपं सेलिब्रिटी कसं बनलं? त्यांचा हा प्रवास कसा होता.एका व्ही़डिओच्या माध्यमातून त्यांनी आपला प्रवास उलगडला आहे. गणेश आणि योगिता शिंदे या सगळ्या प्रवासात कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं, कोणकोणत्या अडचणी आल्या याविषयी खुलासा केला आहे.

शून्यातून यूट्यूब सेलिब्रिटी होण्यापर्यंतचा प्रवास...  Ganesh Shinde आणि Yogita Shinde यांनी उलगडला, सहज- साधा पण प्रेरणादायक...
Image Credit source: गणेश शिंदे इन्स्टाग्राम
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 4:27 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण प्रसिद्ध होत आहेत. अनेकांना सोशल मीडियाने स्टार केलं आहे. असंच एक जोडपं आणि त्यांची चिमुकली तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल. त्यांचे अनेक फॉलोव्हर्स आहेत. गणेश शिंदे (Ganesh Shinde), योगिता शिंदे (Yogita Shinde) आणि शिवानी शिंदे (Shivani Shinde) यांचे फेसबुक आणि युट्यूब व्हीडिओ तुम्ही पाहिले असतील. त्यांचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या व्हीडिओंना मिलियनमध्ये व्ह्यूज मिळतात. त्यांचा साधेपणा, साधं राहणं हीच त्यांच्या व्हीडिओची खासियत आहे.पण इतक्या साधेपणानं राहणारं हे जोडपं सेलिब्रिटी कसं बनलं? त्यांचा हा प्रवास कसा होता. एका व्ही़डिओच्या माध्यमातून त्यांनी आपला प्रवास उलगडला आहे. या व्हीडिओत त्यांनी या सगळ्या प्रवासात कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं, कोणकोणत्या अडचणी आल्या याविषयी खुलासा केला आहे. शिवाय व्हीडिओवरच्या कमेंट वाचून डिप्रेशन येत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

सहज, सोपा पण प्रेरणादायक प्रवास ग्रामीण भागातलं हे जोडपं अनेकांच्या पसंती उतरतंय. त्यांचं साधं बोलणं अनेकांना आपलंस करून जातं. या दोघांचा यूट्यूबर होण्याचा प्रवासही तितकाच रंजक आहे. “मोबाईल खरेदी केला तेव्हा मेल आयडी क्रिएट केल्यानंतर यूट्यूबला आपोआप चॅनेल क्रिएट झालं. त्यावर फोटो वगैरे अपलोड केला आणि पुढे यूटयूबवरच बघून चॅनेल ग्रो केलं”, असं गणेश यांनी या व्हीडिओत सांगितलं आहे.

व्हीडिओ बनवताना काय अडचणी येतात?

व्हीडिओ बनवताना कोणत्या अडचणी येतात याबद्दलही या दोघांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “आमची लहान मुलं घेऊन व्हीडिओ बनवणं मोठा टास्क असतो. लहान असल्यामुळे ते रडतात. त्यामुळे व्हीडिओ बनवताना थोडी अडचण येते”. असं त्यांनी सांगितलं आहे.

कमेंट्स पाहून काय वाटतं?

“यूट्यूब किंवा फेसबुकला व्हीडिओ अपलोड केल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट पहायला मिळतात. यातल्या काही कमेंट पॉझिटिव्ह असतात तर काही कमेंटमुळे मनाचं खच्चीकरण होतं. डिप्रेशन येतं”, असं गणेश म्हणाले आहेत. “व्हीडिओ काही सेकंद बघितला जातो आणि लगेच कमेंट करून हा व्हीडिओ वाईट आहे बघू नका म्हणतात. पैसे कमवण्यासाठी काहीही करतात, बायकोला घेऊन नाचतो, मुलांना कामाला लावलं, तुमची बायको कशीतरीच दिसते, कामाचं बघा… व्हीडिओ काय बनवता, अशा निगेटिव्ह कमेंटमुळे मन खचतं”, असं गणेश आणि योगिता म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या

Oscar मधल्या विल स्मिथ प्रकारावर नीतू कपूर यांची प्रतिक्रिया; ‘म्हणे महिला भावनांना…’

The Kashmir Files : “पंतप्रधानांनीच सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं तर देशात एक वाक्यता टिकणार कशी?”, शरद पवारांचा मोदींना सवाल

Lock Upp: “करिअरला रुळावर आणण्यासाठी मी वशीकरण केलं होतं”; अभिनेत्रीचा खुलासा

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.