सकाळी काश्मीरमधून निघालो आणि…, पत्नी आणि मुलासोबत फिरायला गेलेल्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत काय झालं?
Pahalgam Terror Attack: जम्मू - काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात अनेकांनी आपले प्राण गमावले आहे. तर अनेक जण अद्यापही त्याठिकाणी अडकले आहे. प्रसिद्ध अभिनेता देखील कुटुंबासोबत काश्मीर फिरण्यासाठी गेलेला पण...

Pahalgam Terror Attack: जम्मू – काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात अनेकांनी आपले प्राण गमावले आहे. तर अनेक जण जखमी आहेत. तर अनेक अद्यापही पहलगाममध्ये अडकले आहेत. दरम्यान, प्रसिद्ध अभिनेता शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर देखील कुटुंबासोबत काश्मीर फिरण्यासाठी गेले होते. दीपिका आणि शोएब सतत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत होते. अशात हल्ल्या झाल्यानंतर दोघांच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. पण हल्ल्यात दीपिका आणि शोएब यांनी काहीही झालेलं नाही. दोघे आणि त्यांचे कुटुंबिय देखील सुरक्षित आहेत.
View this post on Instagram
शोएब याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आम्ही सुखरुप असल्याची माहिती दिली आहे. कश्मीरमधून देखील दोघे आता बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर एका पोस्ट शेअर करत शोएब म्हणाला, ‘तुम्हा सर्वांना आमच्या सुरक्षिततेची काळजी आहे. आम्ही सर्व सुरक्षित आणि ठीक आहोत. आम्ही आज सकाळी काश्मीरमधून निघालो आणि आता सुरक्षितपणे दिल्लीला पोहोचलो आहोत. आमची काळजी घेतल्याबद्दल सर्वांचे आभार.’ सध्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात किती जणांचा मृत्यू
मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा मोठा दहशतवादी हल्ला झाला. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. या हल्ल्यात सुमारे 27 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे आणि अनेक जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.
या हल्ल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकार सक्रिय झाले आहेत. सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. देशातील सर्व मोठ्या नेत्यांनी या भ्याड घटनेचा निषेध केला आहे आणि दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.