Shoaib Malik : लग्नानंतर काही तासांत शोएब मलिकला मिळाली आनंदाची बातमी, विक्रमच रचला

Shoaib Malik Affair : 'तू तर प्रत्येक गोष्टीत विक्रम रचतोय....', तिसऱ्या लग्नानंतर काही तासांत शोएब मलिक याचा आनंद झाला द्विगुणित, रचला विक्रम... सर्वत्र फक्त आणि फक्त शोएब मलिक याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Shoaib Malik : लग्नानंतर काही तासांत शोएब मलिकला मिळाली आनंदाची बातमी, विक्रमच रचला
Follow us
| Updated on: Jan 21, 2024 | 8:13 AM

Shoaib Malik life : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक सानिया मिर्झापासून विभक्त झाल्यानंतर शनिवारी तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. सध्या भारतात आणि पकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत असलेला शोएब याच्या आनंदात आणखी भर पडली आहे. शोएब याने त्याचा आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शोएब याच्या सोशल मीडियावर पोस्टची चर्चा रंगली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये शोएब याने मोठा विक्रम रचला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये मोठा विक्रम रचणारा शोएब हा आशियातील पहिला फलंदाज ठरला आहे.

शोएब मलिक सध्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये फॉर्च्युन बरीशालकडून खेळत आहे. शोएब याने रंगपूर रायडर्स यांच्यातील सामन्यात टी-20 विक्रम आपल्या नावावर केला. या सामन्यात शोएबने 17 धावा केल्या आणि एक विकेट घेतली. यासोबतच टी-20 क्रिकेटमध्ये 13000 धावा करणारा तो आशियातील पहिला फलंदाज ठरला आहे.

सांगायचं झालं तर, आशिया खंडात अशी कामगिरी अद्याप कोणत्याच क्रिकेटपटूला करता आलेली नाही. पण शोएब ख्रिस गेलच्या तुलनेत मागे आहे. ख्रिस गेल याच्याबद्दल सांगायचं झालं तर गेल याने 13 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल सांगायचं झालं तर,  शोएब मलिकच्या नावावर 124 सामन्यात 2435 धावा आहेत.

शोएब सध्या त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. शोएब याने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना शोएब याला ट्रोल देखील केलं आहे. अनेकांनी कमेंटमध्ये सानिया मिर्झा हिच्या नावाचा देखील उल्लेख केला आहे.

शोएब मलिक याचं खासगी आयुष्य

शोएब मलिक याने त्याच्या खासगी आयुष्यात देखील विक्रम रचला आहे. क्रिकेटपटूने तीन लग्न केली आहेत. शोएब याने पहिलं लग्न 2002 मध्ये आयेशा हिच्यासोबत केलं होतं. त्यानंतर 2010 मध्ये शोएब आणि आयेशा यांचे मार्ग वेगळे झाले. त्यानंतर सानिया मिर्झा हिला अनेक महिने डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं.

शोएब याच्यासोबत लग्नाच्या 8 वर्षांनंतर सानिया हिने मुलाला जन्म दिला. सांगायचं झालं तर, गेल्या अनेक महिन्यांपासून सानिया आणि शोएब यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, शोएब याने तिसऱ्या लग्नाचे फोटो पोस्ट करत रंगणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शोएब याने सोशल मीडियावर तिसऱ्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.