Shoaib Malik : ‘मी शोएब मलिकची पत्नी…’, क्रिकेटरच्या तिसऱ्या लग्नानंतर चौथ्या महिलेचा धक्कादायक खुलासा
Shoaib Malik : शोएब मलिक याच्या पत्नी तरी किती? सना जावेद हिच्यासोबत तिसरं लग्न केल्यानंतर, 'ही' चौथी महिला म्हणते, 'मी शोएब मलिकची पत्नी...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शोएब मलिक याच्या खासगी आयुष्याची चर्चा...
मुंबई | 24 जानेवारी 2023 : पाकिस्तानी माजी क्रिकेटर शोएब मलिक याच्या तिसऱ्या लग्नामुळे भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात खळबळ माजली आहे. शोएब याने दुसरी पत्नी सानिया मिर्झा हिला घटस्फोट दिल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं. शोएब याने लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शोएब मलिक आणि सना याच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. दरम्यान दुसऱ्या एका पाकिस्तानी अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री शोएब याच्यासोबत झालेल्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहे.
शोएब याच्यासोबत झालेल्या लग्न झाल्याच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमर हिने मोठं वक्तव्य केलं आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत आयेशा उमर हिने शोएब याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आयशा उमर आणि शोएब मलिक यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
शोएब याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल आयेशा म्हणते, ‘शोएब याच्यासोबत तर माझं लग्न लाऊन दिलं.. सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या.. चर्चांमुळे मला भीती वाटू लागत होती. शोएब आणि माझ्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना आमचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘लोकांनी तर माझं लग्न करून दिलं. आज देखील मित्र, नातेवाईकांना वाटतं माझं आणि शोएबचं लग्न झालं आहे…’ सांगायचं झालं तर, आयेशा हिने शोएब याच्यासोबत रंगणाऱ्या नात्याच्या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त शोएब आणि आयेशा यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा
सना हिच्यासोबत शोएब याचं तिसरं लग्न आहे. शोएब याने पहिलं लग्न 2002 मध्ये आयेशा हिच्यासोबत केलं होतं. त्यानंतर शोएब याने दुसरं लग्न सानिया मिर्झा हिच्यासोबत केलं. लग्नानंतर दोघे दुबई याठिकाणी राहात होते. शोएब याच्यासोबत लग्नाच्या 8 वर्षांनंतर म्हणजे 2018 मध्ये सानिया हिने मुलाला जन्म दिला. दोघांचा मुलगा आता पाच वर्षांचा आहे.