पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट करतोय आर्यन खान? खुद्द सादिया खान हिने सांगितलं सत्य
'माझा आणि आर्यनचा फोटो पाहिल्यानंतर....', पाकिस्तानी अभिनेत्रीने सांगितलं किंग खानच्या मुलासोबत असलेल्या नात्याचं सत्य
Aryan Khan dating Pakistani actress : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सर्वप्रथम अभिनेत्री नोरा फतेही हिच्यासोबत आर्यनच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली. नोरानंतर आर्यन एका पारिस्तानी अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला. आर्यन खानसोबत जोडण्यात आलेल्या पाकिस्तानी अभिनेत्रीचं नाव सादिया खान आहे. नवं वर्षाचं स्वागत आर्यन, सुहाना आणि सादियाने एकत्रच केल्याची चर्चा रंगली.
खुद्द सादियाने सोशल मीडियावर आर्यन खानसोबत फोटो पोस्ट केला. या फोटोनंतर आर्यन आणि सादिया रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला. रंगणाऱ्या चर्चांवर खुद्द सादिया खानने उत्तर दिलं आहे. सध्या सर्वत्र सादियाने दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चा रंगत आहे.
एका मुलाखतीत सादिया म्हणाली, ‘कोणत्याही प्रकारचं सत्य न जाणून घेता लोक माझ्या आर्यनबद्दल या प्रकारच्या गोष्टी करत आहेत. फक्त एक फोटो पाहून लोक असं कंस बोलू शकतात. या प्रकारच्या चर्चा रंगवण्याच्या देखील मर्यादा आहेत.’ असं सादिया म्हणाली.
पुढे सादिया म्हणाली, ‘न्यू ईयरच्या पार्टीमध्ये आम्ही भेटलो होतो. फोटो क्लिक करायाच्या आधी आम्ही गप्पा मारल्या. याचा अर्थ असा नाही, आम्ही एकमेकांना डेट करतोय. आर्यनसोबत फक्त मी फोटो काढला नाही. इतर लोकांनी देखील त्याच्यासोबत फोटो काढन सोशल मीडियावर पोस्ट केला. पण आमच्या दोघांचा फोटो का व्हायरल झाला माहिती नाही.’
आर्यनबाबत अभिनेत्री म्हणाली, ‘आर्यन एक उत्तम व्यक्तिमत्त्व आहे. त्याठिकाणी आर्यन सर्वांसोबत गप्पा मारत होता. त्याच्याबाबत अशा अफवा पसरत असतील तर ते योग्य नाही…’ असं देखील सादिया म्हणाली.
रंगलेल्या डेटिंगच्या चर्चांनंतर आर्यन खानच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ड्रग्स प्रकरणातून दिलासा मिळाल्यानंतर आर्यनने त्याच्या कामाची सुरुवात केली आहे. नुकताच आर्यनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये आर्यनने स्क्रिप्ट पूर्ण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. आर्यन आता शुटिंगच्या प्रतीक्षेत आहे.