Palak Tiwari | इशान खट्टरला ॲटिट्यूड दाखवल्याने पलक तिवारी जोरदार ट्रोल; नेटकरी म्हणाले ‘तिला वाटतं की..’

अभिनेत्री पलक तिवारी सध्या तिच्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यामध्ये ती शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टरला साफ दुर्लक्ष करताना दिसतेय. यावरून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलंय.

Palak Tiwari | इशान खट्टरला ॲटिट्यूड दाखवल्याने पलक तिवारी जोरदार ट्रोल; नेटकरी म्हणाले 'तिला वाटतं की..'
Palak TiwariImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 11, 2023 | 10:08 AM

मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पलक तिवारी तिच्या डेब्युसोबतच खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आली. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खानसोबत तिचं नाव जोडलं जातं. बॉलिवूडच्या विविध पार्ट्यांमध्येही पलकला आवर्जून पाहिलं जातं. नुकतीच तिने एका कार्यक्रमाला अत्यंत ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली होती. मात्र या कार्यक्रमातील एका व्हिडीओवरून पलकला जोरदार ट्रोल केलं जातंय. पलक तिवारीला खूपच ॲटिट्यूड आहे, असं नेटकरी म्हणतायत.

सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडीओमध्ये पलक तिवारी आणि अभिनेता इशान खट्टर दिसून येत आहे. इशान समोर असूनही पलक त्याच्याकडे पाहतसुद्धा नाही. नंतर तिला जेव्हा पुढे जायचं असतं तेव्हा इशान नम्रतेने तिला आधी जाऊ देतो. तेव्हासुद्धा ती त्याच्याकडे स्पष्ट दुर्लक्ष करते. पलकच्या या वागण्यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जातंय. ‘तो किती नम्रतेने वागतोय. पण तिला किती ॲटिट्यूड आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘हा पलकचा ॲटिट्यूड नाही, तर ती कशामुळे तरी नाराज दिसून येतेय,’ असा बचाव तिच्या चाहत्याने केला.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

‘ते दोघं सोबत अनकम्फर्टेबल दिसत आहेत. हातात कोणतंही काम नसताना स्टार ॲटिट्यूड कसल्या कामाचा’, असा सवाल एका युजरने केला. तर इब्राहिमवरूनही पलकला ट्रोल करण्यात आलं. ‘तिला असं वाटतं की तिच्यासाठी इब्राहिमच बनला आहे. त्याच्यासमोर बाकी सगळे काहीच कामाचे नाहीत’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी पलक तिवारीला सुनावलं.

इंडस्ट्रीत पाऊल ठेवताच पलकचं नाव सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानशी जोडलं गेलं. या दोघांना एकत्र एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना पाहिलं गेलं होतं. त्यावेळी पलकने पापाराझींपासून स्वत:चा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दिलेल्या विविध मुलाखतींमध्ये तिला इब्राहिमला डेटिंग करण्याबद्दल प्रश्न विचारला असता तो फक्त मित्र असल्याचं तिने स्पष्ट केलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वीच इब्राहिम आणि पलकला पुन्हा एकदा ‘मूव्ही डेट’ला जाताना पाहिलं गेलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.