AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OMG 2 वरून सुरू असलेल्या वादावर अखेर पंकज त्रिपाठी यांनी सोडलं मौन; सेन्सॉर बोर्डाविषयी म्हणाले..

‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अमित राय यांनी केलं असून यामध्ये अक्षय कुमार शंकराच्या भूमिकेत आहे. अक्षयसोबतच यामध्ये यामी गौतम, पंकज त्रिपाठी आणि रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविलसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

OMG 2 वरून सुरू असलेल्या वादावर अखेर पंकज त्रिपाठी यांनी सोडलं मौन; सेन्सॉर बोर्डाविषयी म्हणाले..
Pankaj Tripathi in OMG 2Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 12:36 PM

मुंबई | 19 जुलै 2023 : बॉलिवूड इंडस्ट्रीत आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता पंकज त्रिपाठी आगामी ‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र हा चित्रपट घोषित झाल्यापासून त्यावर वाद सुरू आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत आणि ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या वेळी झालेली चूक पुन्हा होऊ नये यासाठी सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला रिव्हिजन कमिटीकडे पाठवलं आहे. आता रिव्हिजन कमिटी या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याबद्दल अंतिम निर्णय घेणार आहे. त्यापूर्वी चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला रोखल्याची चर्चा सुरू झाली. या सर्व चर्चांदरम्यान आता पंकज त्रिपाठी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी या चित्रपटाविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहेत. आतापर्यंत चित्रपटाच्या टीमकडून यावर कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नव्हती. मात्र आता पंकज त्रिपाठी त्यावर व्यक्त झाले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, “मी फक्त इतकंच म्हणेन की कृपया याविषयी जे लिहिलं जातंय त्यावर विश्वास ठेवू नका. लोक खूप काही म्हणत आहेत. मात्र जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा सत्य सर्वांसमोर येईल.” ‘ओएमजी 2’च्या प्रदर्शनाबाबत पंकज त्रिपाठी सकारात्मक असल्याचं दिसून आलं.

प्रभास आणि क्रिती सनॉन यांच्या भूमिका असलेल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाला बऱ्याच विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. इतकंच नव्हे तर अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने या चित्रपटावरून सेन्सॉर बोर्डालाही सुनावलं होतं. सेन्सॉर बोर्डाने अशा चित्रपटाला प्रमाणपत्र दिलंच कसं, असा सवाल कोर्टाने केला होता. म्हणूनच आता ‘OMG 2’ या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याआधी बोर्डाकडून पूर्वकाळजी घेतली जात आहे. ‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटातील कोणते संवाद आणि सीन्स सेन्सॉर बोर्डाला खटकले आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती अद्याप समोर आली नाही.

हे सुद्धा वाचा

‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अमित राय यांनी केलं असून यामध्ये अक्षय कुमार शंकराच्या भूमिकेत आहे. अक्षयसोबतच यामध्ये यामी गौतम, पंकज त्रिपाठी आणि रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविलसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. येत्या 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 2012 मध्ये ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. मात्र सीक्वेलची कथा पूर्णपणे वेगळी असल्याचं कळतंय.

युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल.
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल.
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?.
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर...
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर....
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?.
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.