Pankaj Tripathi | “आज बाबूजी असते..”; राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्यानंतर पंकज त्रिपाठी भावूक

मिमी या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी भानू प्रताप पांडे या टॅक्सी ड्रायव्हर आणि क्रिती सनॉनच्या मित्राची भूमिका साकारली होती. याच चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी क्रितीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Pankaj Tripathi | आज बाबूजी असते..; राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्यानंतर पंकज त्रिपाठी भावूक
Pankaj TripathiImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 9:15 AM

मुंबई | 25 ऑगस्ट 2023 : 2021 वर्षासाठीच्या 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली. ‘मिमी’ या चित्रपटासाठी अभिनेते पंकज त्रिपाठी यांना साहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. काही दिवसांपूर्वीच पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचं निधन झालं. 21 ऑगस्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज यांनी त्यांना मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार वडील पंडीत बनारस त्रिपाठी यांना समर्पित केला. “आज बाबूजी असते तर ते खूप खुश झाले असते”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

राष्ट्रीय पुरस्काराविषयी बोलताना ते म्हणाले, “दुर्दैवाने माझ्यासाठी हा काळ दु:खाचा आहे, कारण मी माझी सर्वांत जवळची व्यक्ती गमावली आहे. आज बाबूजी असते तर ते माझ्यासाठी खूप खुश झाले असते. जेव्हा राष्ट्रीय पुरस्कारासाठी पहिल्यांदा माझा उल्लेख झाला तेव्हा त्यांना खूप आनंद झाला होता. त्यांच्यासाठी तो फार अभिमानास्पद क्षण होता. हा राष्ट्रीय पुरस्कार मी त्यांना समर्पित करतो. आज मी जो काही आहे, तो त्यांच्यामुळेच आहे. त्यांना गमावल्यामुळे मला आता बोलायला फार शब्द सुचत नाहीयेत. पण मिमी या चित्रपटाच्या टीमसाठी मी खुश आणि कृतज्ञ आहे. क्रिती सनॉननेही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. त्यामुळे तिलासुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.”

मिमी या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी भानू प्रताप पांडे या टॅक्सी ड्रायव्हर आणि क्रिती सनॉनच्या मित्राची भूमिका साकारली होती. याच चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी क्रितीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

हे सुद्धा वाचा

21 ऑगस्ट रोजी पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. ते 99 वर्षांचे होते. बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील बेलसंड गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज त्रिपाठी यांची वडिलांशी फार जवळीक होती. ते मुंबईत कामासाठी स्थायिक झाले असले तरी आईवडिलांची भेट घेण्यासाठी ते सतत गावी जायचे. गावी गेल्यावर ते आवर्जून वडिलांसोबत वेळ घालवायचे. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे किंवा विविध मुलाखतींमध्येही ते अनेकदा त्यांच्या आयुष्यातील आईवडिलांच्या योगदानाबद्दल व्यक्त व्हायचे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.