सतीश कौशिक यांच्यानंतर बॉलिवूडला आणखी एक धक्का; ‘परिणीता’चे दिग्दर्शक प्रदीप सरकार काळाच्या पडद्याआड

प्रदीप हे जाहिरातीच्या क्षेत्रातही सक्रिय होते. 'धूम पिचाक धूम', 'माएरी', 'अब के सावन' यांसारखे सुपरहिट म्युझिक व्हिडीओसुद्धा त्यांनीच शूट केले होते. राजकुमार हिरानीसोबत त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.

सतीश कौशिक यांच्यानंतर बॉलिवूडला आणखी एक धक्का; 'परिणीता'चे दिग्दर्शक प्रदीप सरकार काळाच्या पडद्याआड
Pradeep SarkarImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 10:06 AM

मुंबई : अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनानंतर बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी जगाचा निरोप घेतला. ते 67 वर्षांचे होते. सैफ अली खान आणि विद्या बालन यांच्या ‘परिणीता’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. शुक्रवारी पहाटे 3.30 च्या सुमारास प्रदीप यांनी अखेरचा श्वास घेतला. ते डायलिसिसवर होतो आणि अचानक त्यांच्या शरीरातील पोटॅशियमची पातळी कमी झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रदीप यांचे प्राण वाचू शकले नाहीत.

अजय देवगणसह इतर सेलिब्रिटींनी व्यक्त केला शोक

प्रदीप सरकार यांचे मित्र आणि दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ट्विट करत निधनाची माहिती दिली. ‘प्रदीप सरकार दादा, तुझ्या आत्म्याला शांती लाभो’, असं त्यांनी लिहिलं. अभिनेता मनोज बाजपेयीने शोक व्यक्त केला. ‘हे अत्यंत धक्कादायक आहे. तुमच्या आत्म्याला शांती लाभो दादा’, अशी पोस्ट त्याने लिहिली आहे. अजय देवगणनेही ट्विट करत भावना व्यक्त केल्या आहेत. ‘प्रदीप सरकार दादा यांच्या निधनाचं वृत्त पचवणं अजूनही आम्हाला कठीण होत आहे. त्यांच्या कुटुंबीयांसाठी मी सहवेदना व्यक्त करतो’, असं त्याने लिहिलंय.

सांताक्रूझमध्ये पार पडणार अंत्यसंस्कार

“प्रदीप यांना गुरुवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. ते डायलिसिसवर होतो आणि त्यांना आरोग्याच्या इतरही समस्या होत्या. संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास सांताक्रूझ इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडतील”, अशी माहिती प्रदीप यांच्या जवळच्या व्यक्तीने दिली.

हे सुद्धा वाचा

बॉलिवूडमधील करिअर

प्रदीप यांनी 2005 मध्ये ‘परिणीता’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांनी 2007 मध्ये ‘लागा चुनरी मे दाग’, 2010 मध्ये ‘लफंगे परिंदे’, 2014 मध्ये ‘मर्दानी’ आणि 2018 मध्ये ‘हेलिकॉप्टर ईला’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. प्रदीप यांनी त्यांच्या करिअरमध्ये फार कमी चित्रपट बनवले, मात्र त्यांना प्रेक्षकांकडून पसंती मिळाली. चित्रपटांशिवाय त्यांनी ‘फोरबिडन लव्ह’ आणि ‘दुरंगा’ यांसारख्या वेब सीरिजचंही दिग्दर्शन केलं आहे.

प्रदीप हे जाहिरातीच्या क्षेत्रातही सक्रिय होते. ‘धूम पिचाक धूम’, ‘माएरी’, ‘अब के सावन’ यांसारखे सुपरहिट म्युझिक व्हिडीओसुद्धा त्यांनीच शूट केले होते. राजकुमार हिरानीसोबत त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटासाठी त्यांनी को-एडिटर म्हणून काम केलं होतं.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.