AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parineeti Chopra – Raghav Chadha कधी अडकणार विवाहबंधनात? अभिनेत्रीच्या वडिलांकडून मोठी अपडेट

चोप्रा कुटुंबात वाजणार सनई-चौघडे! अभिनेत्रीच्या वडिलांकडून लेकीच्या लग्नाबद्दल मोठी अपडेट समोर; लवकरच विवाहबंधनात अडकणार परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा!

Parineeti Chopra – Raghav Chadha कधी अडकणार विवाहबंधनात? अभिनेत्रीच्या वडिलांकडून मोठी अपडेट
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 9:33 AM

मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा (Parineeti Chopra – Raghav Chadha) यांच्या नात्याबद्दल सध्या सर्वत्र चर्चा रंगत आहेत. नुकताच परिणीती हिला आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत एका हॉटेल बाहेर स्पॉट करण्यात आलं. त्यानंतर दोघांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. असलेल्या नात्याला परिणीती आणि राघव कधी दुजोरा देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोघांनी अद्याप नात्यावर कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. अशात परिणीतीचे वडिलांनी दोघांच्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्रीचे वडिल पवन चोप्रा यांनी लेकीचं राघव यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र परिणीती आणि राघव यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे.

परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा दोघे त्यांच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा करतील असा अंदाज चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याच दरम्यान, परिणीती चोप्रा हिच्या वडिलांनी केले वक्तव्य हैराण करणारं आहे. पवन चोप्रा म्हणाले, ‘आता त्यांच्या त्यांच्या नात्यावर बोलणं योग्य ठरणार नाही…’ एवढंच नाही तर, अभिनेत्रीच्या आईने लेकीच्या नात्याबद्दल मौन बाळगलं आहे.

हे सुद्धा वाचा

परिणीती – राघव लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर अद्याप परिणीती – राघव यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. परिणीतीला हॉटेलबाहेर खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत स्पॉट केल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या. दरम्यान, आम आदमी पक्षाचे खासदार संजीव आरोरा यांनी ट्विट करत दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

कशी सुरु झाली दोघांच्या नात्याची सुरुवात?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मिस्टर चड्ढा आणि मिस चोप्रा सध्या त्यांच्या रिलेशनशिपबद्दल काहीही सांगत नाही, पण आता नात्याचा स्वीकार कोण करतं. पण आप पक्षाच्या नेत्याने दोघांना शुभेच्छा दिल्या हिच खूप मोठी गोष्ट आहे…’

ते पुढे म्हणाले, ‘परिणीतीची बहीण प्रियांका चोप्रा तिच्या आगामी ‘सिटाडेल’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुंबईत आली आहे. ती परिणीतीला भेटेल. पण राघव यांना भेटू शकेल की नाही याबद्दल काहीही सांगता येत नाही…’

आता परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर कधी करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राघव आणि परिणीती एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. लंडनमध्ये दोघांनी शिक्षण पूर्ण केलं आहे. आता दोघांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत चाहते आहेत.

कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट.
हिंदीची सक्ती नाही, मग तसा जीआर काढा; सुभाष देसाई यांची मागणी
हिंदीची सक्ती नाही, मग तसा जीआर काढा; सुभाष देसाई यांची मागणी.
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती.
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली.
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.