AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parineeti Chopra : पती राजकारणात असल्यामुळे परिणीती घेणार ‘हा’ मोठा निर्णय? अभिनेत्री म्हणाली…

Parineeti Chopra : पती राघव चड्ढा राजकारण असल्यामुळे परिणीती चोप्रा घेणार 'असा' मोठा निर्णय, ज्याचा अभिनेत्रीला होईल फायदा? खुद्द अभिनेत्रीने सोडलं मौन, परिणीती असं काय म्हणाली, ज्यामुळे सर्वत्र रंगली आहे अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

Parineeti Chopra : पती राजकारणात असल्यामुळे परिणीती घेणार 'हा' मोठा निर्णय? अभिनेत्री म्हणाली...
Follow us
| Updated on: Dec 11, 2023 | 2:20 PM

मुंबई | 11 डिसेंबर 2023 : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने आम आदमी पक्षाचे निलंबित खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत लग्न केलं आहे. 24 सप्टेंबर 2023 मध्ये शाही थाटात परिणीती आणि राघव यांनी उदयपूर याठिकाणी लग्न केलं. परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. लग्नानंतर देखील परिणीती – राघव एकत्र फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसले. चाहते देखील दोघांच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. आता देखील परिणीती आणि राघव एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त परिणीती आणि राघव यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

परिणीती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सध्या आगामी ‘चमकिला’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत परिणीती हिला एक प्रश्न विचारण्यात आला. राघव चड्ढा राजकारणात असल्यामुळे तू राजकारणात प्रवेश करणार का? या प्रश्नानंतर पती राजकारणात असल्यामुळे अभिनेत्रीला त्याचा फायदा होईल का? अशा चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहेत.

राजकारणात प्रवेश करणार परिणीती चोप्रा?

परिणीती चोप्रा म्हणाली, ‘आमच्या यशस्वी नात्याचं रहस्य याठिकाणी मी तुम्हाला सांगते. मला राजकारणातील काहीही माहिती नाही आणि राघव यांना बॉलिवूडमधील… त्यामुळे मला नाही वाटत तुम्ही कधी मला राजकारणार पाहू शकता. लग्नानंतर मला नव्हतं वाटलं तुमच्याकडून इतकं प्रेम मिळेल. मला असं वाटतं जर तुम्ही योग्य व्यक्तीसोबत असाल, तर वैवाहिक आयुष्य फार छान असतं…’

हे सुद्धा वाचा

परिणीती तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल म्हणाली…

‘लग्नानंतर भारतातून मला इतकं प्रेम मिळेल याची मी अपेक्षा देखील केली नव्हती. जर तुम्ही योग्य व्यक्तीसोबत असाल, तर वैवाहिक आयुष्य फार छान असतं. मी माझ्या कामावर पूर्ण लक्ष देते. प्रचंड मेहनत करण्यावर माझा विश्वास आहे. पण मी माझ्या मित्र-मैत्रिणींना भेटते. त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करते..’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी जेव्हा 85 – 90 वर्षांची होईल तेव्हा कोणती खंत मला ठेवायची नाही. आयुष्यात मागे वळून पाहिल्यानंतर मला असं वाटलं पाहिजे, जसं आयुष्य मला जगायचं होतं… तसं आयुष्य मी जगली आहे…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त परिणीती चोप्रा हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे.

पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.
फरार कृष्णा आंधळेचे पुरावे जिच्याकडे 'ती' महिला कोण? मोठी माहिती समोर
फरार कृष्णा आंधळेचे पुरावे जिच्याकडे 'ती' महिला कोण? मोठी माहिती समोर.
हल्ल्यानंतर भारतीय सैन्य अ‍ॅक्शनमोडमध्ये, दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त
हल्ल्यानंतर भारतीय सैन्य अ‍ॅक्शनमोडमध्ये, दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त.
सिंधूत पाणी वाहील किंवा..,मोदींच्या वॉटर स्ट्राईकनंतर भुट्टोचं वक्तव्य
सिंधूत पाणी वाहील किंवा..,मोदींच्या वॉटर स्ट्राईकनंतर भुट्टोचं वक्तव्य.
दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये धास्ती, काश्मीरकडे पर्यटकांची पाठ
दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये धास्ती, काश्मीरकडे पर्यटकांची पाठ.