Pathaan चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला कायम; १२ व्या दिवशी सिनेमाने केली इतक्या कोटींची कमाई

पठाण सिनेमाच्या व्यवसायात मोठी वाढ; सलग १२ दिवशी सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची सिनेमागृहाबाहेर मोठी गर्दी... जगभरात सिनेमाने केली इतक्या कोटींची कमाई

Pathaan चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला कायम; १२ व्या दिवशी सिनेमाने केली इतक्या कोटींची कमाई
Pathan Box Office collection
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 10:06 AM

Pathaan Box Office Collection Day 12 : अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमा गेल्या १२ दिवसांपासून चाहत्यांचं मनोरंज करत आहे. प्रदर्शनाच्या पचव्या दिवसानंतर पठाण सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर मंदावलेल्या कमाईच्या वेगात ११ व्या आणि १२ व्या दिवशी वाढ दिसून आली. शनिवार – रविवार असल्यामुळे सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. पठाण सिनेमा फक्त भारतामध्येच नाही तर, परदेशात देखील नवीन विक्रम रचत आहे. बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त कमाई करणार पठाण एकमेव सिनेमा ठरला आहे. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला सिनेमा १२ दिवसांनंतर देखील चर्चेत आहे. १२ व्या दिवशी पठाण सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. (pathan movie download)

ट्रेड विश्लेषक रमेश बाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून पठाण सिनेमाच्या रविवारचे आकडे जाहिर केले आहेत. रमेश बाला यांच्या ट्विटनुसार, दुसऱ्या आठवड्यात रविवारी सिनेमाने भारतात जवळपास २८ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. पठाण सिनेमाचा बोलबाला १२ व्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे. रमेश बाला यांच्या ट्विटनुसार, जगभरात सिनेमाने ८५० कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे. (pathan full movie)

हे सुद्धा वाचा

प्रेक्षकांच्या मनात पठाण सिनेमाची क्रेझ पाहाता, येत्या काही दिवसांत सिनेमा किती रुपयांची कमाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पठाण सिनेमाच्या कमाईचा आकडा बॉक्स ऑफिसवर मंदावला होता. पण ११ व्या दिवशी पठाण सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली. (pathan movie)

ट्रेड विश्लेषक रमेश बाल यांनी जाहिर केलेल्या ११ व्या दिवसाच्या आकड्यांनुसार सिनेमाने जवळपास २२ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर रविवारी सिनेमाने २८ कोटी कोटी रुपयांची कमाई केली. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या सिनेमाला देशात आणि जगात चांगलीच पसंती मिळत आहे.

सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांनी साकारलेल्या भूमिकांची देखील चर्चा रंगत आहे. पठाण सिनेमात दीपिका जबरदस्त अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे. शिवाय सलमान खानची एक अप्रतिम कॅमिओ भूमिका चाहत्यांच्या मनात घर करत आहे. म्हणून पुन्हा मोठ्या पडद्यावर शाहरुख आणि सलमान खान यांना पाहणं चाहत्यांसाठी खास आहे. (pathaan song)

चार वर्षांपूर्वी शाहरुख २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. चार वर्षांनंतर अभिनेत्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्याने ‘पठाण’ सिनेमाचं प्रमोशन देखील केलेलं नाही. पण ट्विटरवर #askSRK सेशनच्या माध्यमातून अभिनेता थेट चाहत्यांच्या संपर्कात होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.