Pathaan | शाहरुखच्या ‘पठाण’मधील या 7 चुका होतायत व्हायरल; तुम्हाला दिसल्या का?

कॅसी ओनील, क्रेग मॅक्री आणि सुनील रॉड्रीगेज यांसारख्या हॉलिवूडच्या दिग्गज ॲक्शन डायरेक्टर्सनी पठाणमधील ॲक्शन सीन्स दिग्दर्शित केले आहेत. मात्र या चित्रपटात असेही काही सीन्स आहेत, ज्यामागील लॉजिक पाहून तुमचंही डोकं गरगरेल.

Pathaan | शाहरुखच्या 'पठाण'मधील या 7 चुका होतायत व्हायरल; तुम्हाला दिसल्या का?
Pathaan scenesImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 5:31 PM

मुंबई: शाहरुख खानचा चित्रपट तब्बल चार वर्षांनंतर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे किंग खानच्या चाहत्यांसाठी हा जणू उत्सवच आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला थिएटर्समध्ये दमदार प्रतिसाद मिळतोय. सोशल मीडियावरही सध्या त्याचीच जोरदार चर्चा आहे. चाहत्यांना शाहरुख खानचा ॲक्शन अंदाज खूपच आवडला आहे. कॅसी ओनील, क्रेग मॅक्री आणि सुनील रॉड्रीगेज यांसारख्या हॉलिवूडच्या दिग्गज ॲक्शन डायरेक्टर्सनी पठाणमधील ॲक्शन सीन्स दिग्दर्शित केले आहेत. मात्र या चित्रपटात असेही काही सीन्स आहेत, ज्यामागील लॉजिक पाहून तुमचंही डोकं गरगरेल. शाहरुखच्या पठाण या चित्रपटातील त्या 7 मोठ्या चुका कोणत्या ते पाहुयात..

शाहरुखचा चॉपरवाला जादुई सीन

शाहरुख खानचा सर्वांत पहिला ॲक्शन सीन, ज्यामध्ये त्याला खुर्चीला बांधून एक दहशतवादी खूप मारतो. त्यानंतर अचानक धुवाधार फाइट सीन सुरू होतो. तो सर्व दहशतवाद्यांना मारतो आणि गेट बंद असूनही एका बंद जागेतून तो चॉपर घेऊन उडून जातो. चॉपरवर मशीन गन्सने गोळीबार करूनही शाहरुखला कुठेच काही लागत नाही.

हेलिकॉप्टरला बसच्या छताशी बांधण्याचा सीन

चित्रपटात आणखी एक सीन आहे, ज्यामध्ये बसच्या छतावर शाहरुख आणि जॉन अब्राहम यांच्यात जबरदस्त फाइट होते. यावेळी जॉन म्हणजेच जिममध्ये इतकी ताकद असते की तो हेलिकॉप्टरला बसच्या छताशी बांधतो. हा सीन सामान्य व्यक्तींच्या समजण्यापलीकडचा वाटतो.

हे सुद्धा वाचा

सलमान खानच्या एण्ट्रीचा सीन

चित्रपटात सलमान खानच्या एण्ट्रीच्या सीनवर जोरदार टाळ्यांचा कडकडाट होतो. मात्र या सीनमध्येही बऱ्याच चुका आहेत. शाहरुखला कैद केलं जातं आणि त्यानंतर ट्रेनच्या छतावरून अचानक लोखंडाच्या आपटण्याचा आवाज येतो. ट्रेनचं छत फोडून सलमान एण्ट्री घेतो. यात मजेशीर बाब म्हणजे सलमान इतक्या वरून उडी मारतो, पण त्याच्या हातातील कॉफी जराशीही खाली पडत नाही.

दीपिकाची जखम एकीकडे आणि जखमेची पट्टी दुसरीकडे

चित्रपटात जेव्हा दीपिकाला गोळी लागते, तेव्हा तिच्या पोटाच्या डाव्या बाजूला ती गोळी स्पर्श करून जाते. शाहरुख जेव्हा तिच्या जखमेवर पट्टी बांधतो तेव्हा दीपिकाची जखम उजव्या बाजूला दाखवण्यात आली आहे.

दरीत कोसळणाऱ्या ट्रेनचा सीन

या सीनमध्ये शाहरुख आणि सलमान मिळून शत्रूंशी लढताना दिसतात. हे दोघं मशीन गनच्या हल्ल्यापासून वाचतात आणि त्यानंतर चॉपरसुद्धा पाडतात. जेव्हा ट्रेनचा ब्रीज तुटून खाली पडतो, तेव्हा ट्रेनचे एकेक डब्बे दरीत कोसळू लागतात. मात्र शाहरुख आणि सलमान इतक्या जलद गतीने धावू लागतात की रेल्वे रुळ दूर असलं तरी ते उडी मारून त्याला पकडतात.

जिम आणि पठाणचा सीन

हा चित्रपटातील सर्वांत मजेशीर सीन आहे. शाहरुख आणि जॉन हे आकाशात एकमेकांशी लढत असतात. या दोघांमधील ही फाइट अत्यंत विनोदी वाटते.

दीपिकाला कधी स्विमिंग येते तर कधी नाही

चित्रपटात दीपिकाला पाण्याची भीती वाटते, कारण तिने तिच्या डोळ्यांसमोर वडिलांचा मृत्यू होताना पाहिलेलं असतं. यातील एका दृश्यात जेव्हा दीपिका पाण्यात बुडू लागते तेव्हा शाहरुख खान तिला वाचवतो. मात्र आणखी एका सीनमध्ये मात्र ती ऑरेंज मोनॉकिनीमध्ये पाण्यात स्विमिंग करताना दिसते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.