Pathaan | ‘पठाण’मधून हटवण्यात आला शाहरुख खानचा ‘हा’ महत्त्वपूर्ण सीन; जाणून घ्या काय आहे कारण?

प्रदर्शनाच्या अकराव्या दिवसानंतरही हा चित्रपट दोन आकड्यांमध्ये कमाई करताना दिसत आहे. यादरम्यान पठाणमधील एका सीनची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. हा सीन मूळ चित्रपटातून हटवण्यात आल्याचा खुलासा लेखकाने केला आहे.

Pathaan | 'पठाण'मधून हटवण्यात आला शाहरुख खानचा 'हा' महत्त्वपूर्ण सीन; जाणून घ्या काय आहे कारण?
Pathaan scenesImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 8:00 PM

मुंबई: सध्या बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’ या चित्रपटाचीच क्रेझ पहायला मिळतेय. शाहरुख खानने चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेतून कमबॅक केलं आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी पठाणचं रिलीज म्हणजे जणू एखाद्या उत्सवासारखाच आहे. प्रदर्शनाच्या अकराव्या दिवसानंतरही हा चित्रपट दोन आकड्यांमध्ये कमाई करताना दिसत आहे. यादरम्यान पठाणमधील एका सीनची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. हा सीन मूळ चित्रपटातून हटवण्यात आल्याचा खुलासा लेखकाने केला आहे.

शाहरुखचा सीन हटवला

पठाणचे लेखक श्रीधर राघवन यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटाविषयी बरेच खुलासे केले आहेत. त्यांनी सांगितलं, “पठाणच्या ट्रेलरमध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की शाहरुखचा एक टॉर्चर सीन दाखवण्यात आला होता, त्याची खूप चर्चा झाली होती. मात्र आता तुम्ही नीट लक्ष देऊन पाहिलं असेल तर तो सीन तुम्हाला पठाण चित्रपटात दिसला नसेल. चित्रपटाच्या सुरुवातीला शाहरुखच्या एण्ट्रीच्या आधी या सीनला सेट करण्यात आला होता, जसं ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलं आहे. मात्र निर्मात्यांशी चर्चा झाल्यानंतर हा सीन हटवण्यात आला.”

का हटवला सीन?

“कॅरेक्टरच्या बॅकस्टोरीच्या आधारावर आम्ही त्या सीनला चित्रपटातून हटवण्याचा निर्णय घेतला. JOCR स्क्वाडच्या प्रत्येक भूमिकेमागे आम्ही मोठी बॅकस्टोरी लिहिली होती. मात्र चित्रपटात याची फारशी गरज नव्हती. अशा प्रकारचे इतरही काही सीन्स होते, जे लिहिले होते, मात्र त्यांना फायनल करण्यात आला नाही”, असं ते पुढे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

शाहरुखनेही लिहिली कथा

श्रीधर राघवन यांनी हेसुद्धा सांगितलं की शाहरुखने अभिनेत्यासोबत एक लेखक म्हणूनही पठाण चित्रपटासाठी 100 टक्के मेहनत घेतली आहे. जेव्हा मी या चित्रपटाची कथा लिहिली होती तेव्हा मी जाणून चकीत झालो होतो की शाहरुखनेही पठाणसाठी 70 ते 100 पानी कथा लिहिली आहे.

शेवटचा सीन

हॉस्पीटलमध्ये राहून नॉन सर्व्हिस आर्मी अधिकाऱ्याची टीम सेट करण्याची कल्पनासुद्धा शाहरुखचीच होती, असाही खुलासा श्रीधर यांनी केला. इतकंच नव्हे तर शेवटचा सलमान आणि शाहरुखचा सीनसुद्धा श्रीधर यांनी लिहिली नव्हती. “शेवटच्या सीनमध्ये शाहरुख आणि सलमान एकमेकांशी बोलत असतात. ते पाहून मी चकीत झालो होतो, कारण माझ्या स्क्रिप्टच्या ड्राफ्टमध्ये तो सीन नव्हता. नंतर तो आदित्य चोप्रा सरांनी लिहिला होता”, असंही त्यांनी सांगितलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.