Phakaat | विकी-साराच्या ‘जरा हटके जरा बचके’ला विसरा; ‘फकाट’ या मराठी चित्रपटाची जबरदस्त कमाई

प्रेक्षकांचे फक्कड मनोरंजन करणारा हा चित्रपट एलओसीसारख्या संवेदनशील विषयावर बेतलेला आहे. त्याचे गांभीर्य जाऊ न देता, सुरुवातीपासून शेवटपर्यंत मनमुराद हसवणारा हा 'फकाट' चित्रपट सरतेशेवटी प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडणारा आहे.

Phakaat | विकी-साराच्या 'जरा हटके जरा बचके'ला विसरा; 'फकाट' या मराठी चित्रपटाची जबरदस्त कमाई
Phakaat MovieImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 3:22 PM

मुंबई : ‘फकाट’ हा मराठी चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळयांकडूनच दमदार प्रतिसाद मिळत आहे. सगळ्याच थिएटरमध्ये ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड झळकवणाऱ्या या चित्रपटाने वीकेंडला बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने 91.26 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. जबरदस्त विनोदाने भरलेला ‘फकाट’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. या चित्रपटाबद्दल समीक्षकांकडून, प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे ‘फकाट’च्या निमित्ताने बऱ्याच काळाने मराठी सिनेसृष्टीला असा धमाकेदार चित्रपट पाहायला मिळाला आहे. गेल्या चार दिवसांत या चित्रपटाने 1.04 कोटी रुपये कमावले आहेत.

मागील अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. अखेर ‘फकाट’ अवघ्या महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी होत आहे. शुक्रवारी 15.21 लाख रुपये, शनिवारी 27.33 लाख रुपये तर रविवारी या चित्रपटाने 47.72 लाख रुपयांची कमाई केली आहे. प्रेक्षकांचे फक्कड मनोरंजन करणारा हा चित्रपट एलओसीसारख्या संवेदनशील विषयावर बेतलेला आहे. त्याचे गांभीर्य जाऊ न देता, सुरुवातीपासून शेवटपर्यंत मनमुराद हसवणारा हा ‘फकाट’ चित्रपट सरतेशेवटी प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडणारा आहे.

हे सुद्धा वाचा

चित्रपटाच्या यशाबद्दल दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, ”प्रेक्षकांकडून मिळणार प्रतिसाद खरंच आनंददायी आहे. प्रेक्षकांचे हे प्रेम मनाला उभारी देणारे आहे. या चित्रपटासाठी प्रत्येकानेच घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान आहे. हा एक मनोरंजनात्मक चित्रपट असून कुटुंबासमवेत पाहावा असा आहे. अनेकांनी मला फोन, मेसेजद्वारे चांगला चित्रपट असल्याची पावती दिली. आशा आहे की, येणारे पुढील अनेक आठवडे प्रेक्षकांचा असाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल.”

वक्रतुंड एंटरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओज प्रस्तुत, नीता जाधव निर्मित, श्रेयश जाधव दिग्दर्शित ‘फकाट’ या चित्रपटात हेमंत ढोमे, अनुजा साठे, अविनाश नारकर, नितीश चव्हाण, महेश जाधव, किरण गायकवाड आणि कबीर दुहान सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.