“रणबीर कपूर नंगी बातें करता है”, दिग्गज अभिनेत्याच्या मुलाखतीची जोरदार चर्चा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना रणबीरसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, असा प्रश्न विचारण्यात आला. या मुलाखतीत पियुष मिश्रा यांनी थक्क करणारे खुलासे केले.

रणबीर कपूर नंगी बातें करता है, दिग्गज अभिनेत्याच्या मुलाखतीची जोरदार चर्चा
Ranbir Kapoor & Piyush MishraImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 10:35 AM

मुंबई: रणबीर कपूर बहुत बातूनी है.. बेशर्मी की बात करता है.. नंगी बातें करता है.. (रणबीर कपूर खूप बोलका आहे.. निर्लज्जपणे बोलतो.. नग्न गोष्टींबद्दल बोलतो) असं आम्ही नाही दिग्गज अभिनेते आणि लेखक पियुष मिश्रा म्हणत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना रणबीरसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, असा प्रश्न विचारण्यात आला. या मुलाखतीत पियुष मिश्रा यांनी थक्क करणारे खुलासे केले. 2015 मध्ये त्यांनी रणबीरसोबत ‘तमाशा’ या चित्रपटात काम केलं होतं. त्याआधी ‘रॉकस्टार’मध्येही दोघांनी स्क्रीन शेअर केला होता.

पियुष मिश्रा म्हणाले, “रणबीर एक अभिनेता म्हणून खूप चांगला आहे. त्याचं व्यक्तिमत्त्व जादुई आहे. तो खूप बोलका आङे आणि त्याच्याशी बोलताना खूप मजा येते. अनेकदा तो निर्लज्जपणाच्या गोष्टी बोलतो, नग्न गोष्टींबद्दल बोलतो. त्याचं वागणं समोरच्याच्या मनात कुतूहल निर्माण करतं. इम्तियाज अली हा माझा जुना मित्र आहे. तमाशा चित्रपटात माझं तीन दिवसांचं शूटिंग होतं. फक्त एका दिवसात त्याने ते पूर्ण केलं.”

हे सुद्धा वाचा

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणच्या ‘तमाशा’ या चित्रपटात पियुष मिश्रा यांनी एका कथाकाराची भूमिका साकारली होती. हा कथाकारच रणबीरला प्रेरणा देतो. तर ‘रॉकस्टार’ या चित्रपटात त्यांनी एका म्युझिक लेबलच्या मालकाची भूमिका साकारली होती. रणबीरच्या ‘रॉकस्टार’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं आजवर कौतुक केलं जातं. मात्र ‘तमाशा’ला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नव्हता.

पहा व्हिडीओ

रणबीर लवकरच ‘तू झूठी मै मक्कार’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिका साकारतेय. रणबीर आणि श्रद्धाची जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे. त्यामुळे या दोघांमधील केमिस्ट्री कशी असेल, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त रणबीरने दिल्लीतल्या एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केलं होतं. या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करताना रणबीरने पत्नी आलिया भट्ट आणि मुलगी राहा कपूरला व्हॅलेंटाइन डेच्या खास अंदाजात शुभेच्छा दिल्या. त्याच्या या अंदाजाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर जूनमध्ये आलियाने गरोदर असल्याचं जाहीर केलं. नोव्हेंबर 2022 मध्ये तिने मुलगी राहा कपूरला जन्म दिला. 6 फेब्रुवारी 2023 रोजी रणबीर-आलियाची मुलगी तीन महिन्यांची झाली. आतापर्यंत त्यांनी राहाचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.