AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बॉसच्या घरातील महेश भट्ट यांच्या ‘किस’चा किस्सा; ट्रोलिंगनंतर अखेर पूजा भट्टने सोडलं मौन

मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट्ट हे मुलगी पूजा भट्टला पाठिंबा देण्यासाठी काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात पोहोचले होते. यावेळी त्याने इतर स्पर्धकांचीही भेट घेतली. मात्र जेव्हा ते मनीषा राणीजवळ पोहोचले, तेव्हा त्यांनी तिला मिठी मारली आणि किस केलं. हा व्हिडीओ जेव्हा समोर आला, तेव्हा महेश भट्ट यांच्या या […]

बिग बॉसच्या घरातील महेश भट्ट यांच्या 'किस'चा किस्सा; ट्रोलिंगनंतर अखेर पूजा भट्टने सोडलं मौन
Pooja BhattImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 11:22 AM

मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट्ट हे मुलगी पूजा भट्टला पाठिंबा देण्यासाठी काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात पोहोचले होते. यावेळी त्याने इतर स्पर्धकांचीही भेट घेतली. मात्र जेव्हा ते मनीषा राणीजवळ पोहोचले, तेव्हा त्यांनी तिला मिठी मारली आणि किस केलं. हा व्हिडीओ जेव्हा समोर आला, तेव्हा महेश भट्ट यांच्या या वागणुकीमुळे मनीषा अनकम्फर्टेबल झाली असा आरोप नेटकऱ्यांनी केला. त्यावर आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर पूजा भट्टने प्रतिक्रिया दिली आहे. “या घटनेवर मला किंवा माझ्या वडिलांना स्पष्टीकरण देण्याची काहीच गरज नाही”, असं म्हणाली.

“जेव्हा मनीषा दुसऱ्या स्पर्धकांना मिठी मारते आणि त्यांच्याकडे किसची मागणी करते, तेव्हा कोणाला काहीच प्रॉब्लेम नसतो. मला असं वाटतं की लोकांना या गोष्टीचा विसर पडला आहे की आपण जगाला तसंच पाहतो जसे आपण स्वत: असतो. जग जसं आहे तसं आपण त्याकडे पाहत नाही. जर लोक खरंच असा विचार करत असतील तर त्यांना मी फक्त गुड लक इतकंच म्हणू शकते”, अशा शब्दांत पूजा व्यक्त झाली.

हे सुद्धा वाचा

याविषयी ती पुढे म्हणाली, “मला वाटत नाही की महेश भट्ट यांना किंवा मला त्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. त्यांनी बिग बॉसच्या घरात अभिषेकलाही मिठी मारली होती आणि त्यालाही किस केलं होतं. जद हदिद हा खूप सुंदर आहे, अशीही स्तुती त्यांनी केली होती. मनीषाचे चाहते उगाच या घटनेला वाढवत आहेत.”

नेमकं काय घडलं होतं?

महेश भट्ट जेव्हा बिग बॉसच्या घरात जातात, तेव्हा ते मनीषा राणीला किस करतात आणि तिचा हात हातात घेतात. त्यांनी घरात प्रवेश करताच मनीषा त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली झुकते. तेव्हा महेश भट्ट तिला रोखतात आणि स्वत: तिच्या पाया पडू लागलात. त्यानंतर दोघं बराच वेळ एकमेकांकडे पाहताना दिसले. बिग बॉसच्या घरात सतत बडबड करणारी मनीषा त्यांच्यासमोर गप्पच झाली होती. महेश भट्ट तिला म्हणाले की माझ्या डोळ्यांमध्ये बघ आणि दोघांच्या नजरेचा खेळ सुरू झाला. पूजा भट्ट आणि घरातील इतर स्पर्धक हे सर्व पाहत होते.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.