पूजा सावंतकडून प्रेमाची जाहीर कबुली; पोस्ट केले साखरपुड्याचे फोटो

अभिनेत्री पूजा सावंतने नुकताच साखरपुडा केला असून जोडीदारासोबतचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पूजाने हे फोटो पोस्ट करताच त्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे. आयुष्यातील या नव्या प्रवासासाठी खूपच उत्सुक असल्याचं तिने लिहिलं आहे.

पूजा सावंतकडून प्रेमाची जाहीर कबुली; पोस्ट केले साखरपुड्याचे फोटो
Pooja Sawant Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 12:14 PM

मुंबई : 28 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री पूजा सावंतने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. पूजाने सोशल मीडियावर एका खास व्यक्तीसोबत फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पोस्ट करत तिने साखरपुडा केल्याचं जाहीर केलं आहे. पूजाच्या या फोटोंवर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मात्र तिने साखरपुडा कोणाशी केला आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. कारण पूजाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिच्या जोडीदाराचा चेहरा दिसत नाहीये. त्याचे पाठमोरे फोटो पूजाने पोस्ट केले आहेत. तुळशी विवाहनंतर लग्नसराईचा काळ सुरू होतो. अशातच पूजानेही चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

समुद्रकिनाऱ्यावरील त्या खास व्यक्तीला मिठी मारतानाचे फोटो पूजाने पोस्ट केले आहेत. यामध्ये तो पाठमोरा उभा आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये पूजाने साखरपुडा केल्याची माहिती दिली. ‘माझ्या खास व्यक्तीसोबत मी खुल्या मनाने आयुष्यातील हा नवीन अध्याय सुरू करतेय. प्रेमाची जादू आणि आमच्या सुंदर प्रवासासाठी मी फार उत्सुक आहे. आम्ही साखरपुडा केला आहे’, अशा शब्दांत पूजाने भावना व्यक्त केल्या आहेत. यातील एका फोटोमध्ये पूजाच्या हातात साखरपुड्याची अंगठीसुद्धा पहायला मिळतेय.

हे सुद्धा वाचा

पूजाने हे फोटो पोस्ट करताच त्यावर नेटकरी आणि विविध सेलिब्रिटींकडून कमेंट्सचा वर्षाव झाला. पूजाने कोणासोबत साखरपुडा केला, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकत आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने लिहिलं, ‘तुझ्यासाठी मी खूप खूप खुश आहे.’ अभिनेता भूषण प्रधानने पूजाच्या इन्स्टाग्रामवरील बायोवरून कमेंट केली. ‘देवाकडून निवडण्यात आलेल्या खास व्यक्तीसाठी देवाने एक व्यक्ती निवडली आहे’, असं त्याने लिहिलंय. हेमंत ढोमे, सायली संजीव, विशाल निकम, ऋषी सक्सेना, मंजिरी ओक, श्रुती मराठे, वैदेही परशुरामी यांनीसुद्धा कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘आम्ही मुलीकडचे.. वरातीत खूप नाचणार’, असं पुष्कर जोगने कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आहे. ‘तुझ्या परीकथेला आता सुरुवात झाली आहे. तुझ्यासोबत मिळून हा सिझन सेलिब्रेट करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे’, असं प्रार्थना बेहरेनं लिहिलं आहे. ‘अन् अशा प्रकारे डिस्ने चित्रपटाला सुरुवात झाली’, असं सिद्धार्थ चांदेकरने म्हटलंय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.