Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Poonam Pandey : पूनमचा मृतदेह कुठे आहे? कुणालाच माहीत नाही; अंत्यदर्शनासाठी आलेल्या चाहत्यांना मोठा झटका

Poonam Pandey Death News : बाॅलिवूड अभिनेत्री पूनम पांडे हिच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर पूनम पांडे हिच्या निधनानंतर आता विविध चर्चा या बघायला मिळत आहेत. चाहत्यांना तर मोठा झटका बसलाय. पूनम पांडे हिचा मृतदेह नेमका कुठे आहे, हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय.

Poonam Pandey : पूनमचा मृतदेह कुठे आहे? कुणालाच माहीत नाही; अंत्यदर्शनासाठी आलेल्या चाहत्यांना मोठा झटका
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 6:10 PM

मुंबई : माॅडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. पूनम पांडे हिने अवघ्या 32 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. पूनम पांडे हिच्या निधनानंतर विविध चर्चा या रंगताना दिसत आहे. पूनम पांडे हिच्या मॅनेजरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निधनाच्या बातमीला दुजोरा दिला खरा मात्र, अनेक मोठे प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. हेच नाही तर नेमके पूनम पांडे हिचे निधन झाले कुठे हे देखील कळत नाहीये. पूनम पांडे हिचे निधन गर्भाशयातील कॅन्सरने झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दुसरीकडे हे सांगितले जातंय की, पूनम पांडे हिने सुसाईट केले.

पूनम पांडे हिच्यावर अंत्यसंस्कार हे मुंबईमध्येच होणार असल्याचे सांगितले जातंय. मात्र, आता पूनम पांडे हिच्या अंत्यदर्शनासाठी गेलेल्या चाहत्यांना मोठा झटका बसल्याचे बघायला मिळतंय. पूनम पांडे ही लोखंडवालामधील ज्या इमारतीमध्ये राहते. त्याठिकाणी पूनमच्या अंत्यदर्शनासाठी काही चाहते हे पोहचले. मात्र, तिथे गेल्यावर चाहत्यांना मोठा झटका बसला.

लोखंडवालामधील पूनम पांडे राहत असलेल्या परिसरात तिच्या निधनाबद्दल कोणीही काहीही भाष्य करण्यास तयार नाहीये. फक्त हेच नाही तर पूनम पांडे हिची बहिण मुंबईतील वरळी भागामध्ये राहते. मात्र, पूनमच्या बहिणीचा फोन देखील सतत बंद येतोय. लोखंडवाला येथे चाहते गर्दी करताना देखील दिसत आहेत.

अखेर पूनम पांडे हिचा मृतदेह नेमका कुठे आहे, हा प्रश्न सातत्याने चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय. हेच नाही तर पूनम पांडे हिच्या अंत्यसंस्काराबद्दलही काहीच अपडेट नाहीत. नेमके कुठे पूनम पांडे हिच्यावर अंत्यसंस्कार करणार हा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित होताना दिसतोय. आता पूनम पांडे हिच्या मृत्यूबाबत काही मोठे खुलासे होऊ शकतात.

पूनम पांडे हिने बाॅलिवूड चित्रपटांपासून करिअरची सुरूवात केली. पूनम पांडे ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. आलिशान गाड्यांचे मोठे कलेक्शन देखील पूनम पांडे हिच्याकडे आहे. पूनम पांडे हिच्या अशाप्रकारे अचानक जाण्याने सर्वांना मोठा धक्का बसलाय. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केल्याचे बघायला मिळतंय.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.