पालकांना लाज वाटली पाहिजे..; लहान मुलीच्या कपड्यांवरून प्रसिद्ध पॉडकास्टर ट्रोल

प्रसिद्ध आरजे आणि पॉडकास्टर सिद्धार्थ कन्ननला सध्या सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. नुकतीच त्याने मुंबईतील एका कार्यक्रमात कुटुंबीयांसह हजेरी लावली होती. यावेळी त्याच्या मुलीचे कपडे पाहून नेटकऱ्यांनी त्याच्यावर आणि त्याच्या पत्नीवर टीका करण्यास सुरुवात केली.

पालकांना लाज वाटली पाहिजे..; लहान मुलीच्या कपड्यांवरून प्रसिद्ध पॉडकास्टर ट्रोल
कुटुंबीयांसह आरजे आणि पॉडकास्टर सिद्धार्थ कन्नन Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 17, 2024 | 9:25 AM

विविध सेलिब्रिटींचे पॉडकास्ट मुलाखती घेणारा देशातील प्रसिद्ध पॉडकास्टर आणि आरजे सिद्धार्थ कन्नन हा नुकताच त्याच्या कुटुंबीयांसह मुंबईतील एका कार्यक्रमात पोहोचला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी नेहा आणि दोन मुली होत्या. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी सिद्धार्थ आणि त्याच्या कुटुंबीयांनी पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. त्यानंतर पापाराझींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र या व्हिडीओतील एका गोष्टीवरून नेटकऱ्यांनी सिद्धार्थ आणि त्याच्या पत्नीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ही गोष्ट म्हणजे सिद्धार्थच्या मुलीचे कपडे. या कार्यक्रमात सिद्धार्थ आणि त्याची पत्नी कॅज्युअल लूकमध्ये दिसले. तर छोट्या मुलीने जीन्स आणि टॉप परिधान केला होता. सिद्धार्थच्या मोठ्या मुलीचे कपडे योग्य नसल्याची टीका अनेकांनी केली. यावेळी तिने काळ्या रंगाची पँट आणि त्यावर क्रॉप टॉप घातला होता.

पापाराझींसमोर पोहोचल्यानंतर सिद्धार्थच्या दोन्ही मुलींनी हसत कॅमेरासमोर पोझ दिले. मात्र मोठ्या मुलीचे कपडे तिच्या वयानुसार योग्य नसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. पापाराझी अकाऊंटवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर क्षणार्धात नकारात्मक कमेंट्स येऊ लागले. अखेर लहान मुलीला ट्रोल केलं जात असल्याने त्या पोस्टवरील कमेंट्स बंद करण्यात आले. वयोमानानुसार तिने घातलेले कपडे ठीक नाहीत, असं एकाने लिहिलं. तर पालकांच्या चुकीमुळे लहान मुलीचं ट्रोलिंग होतंय, असं दुसऱ्याने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

कोण आहे सिद्धार्थ कन्नन?

सिद्धार्थ कन्नन हा प्रसिद्ध टेलिव्हिजन आणि रेडिओ होस्ट, अनाऊंसर, व्हॉइस ओव्हर अभिनेता आणि चित्रपट समिक्षक आहे. वयाच्या 14 व्या वर्षीच त्याने रेडिओ होस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. देशातील सर्वांत लहान रेडिओ होस्ट म्हणून त्याचा विक्रम आहे. 1999 मध्ये त्याने देशातील सर्वांत पहिलं रेडिओ स्कूल सुरू केलं. 2014 मध्ये त्याने नेहाशी लग्न केलं. नेहा आणि सिद्धार्थला दोन मुली आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.