Prabhas: काकांच्या निधनानंतर प्रभासला अश्रू अनावर; चिरंजीवी यांनी केलं सांत्वन

2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या बिल्ला या चित्रपटात प्रभासने पहिल्यांदाच काका कृष्णम राजू यांच्यासोबत काम केलं होतं. 2010 मध्ये वडिलांच्या निधनानंतर अनेकदा प्रभासने काकांशी फार जवळीक असल्याचं व्यक्त केलं होतं.

Prabhas: काकांच्या निधनानंतर प्रभासला अश्रू अनावर; चिरंजीवी यांनी केलं सांत्वन
PrabhasImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 8:11 PM

ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी कृष्णम राजू (Krishnam Raju) यांनी रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. ते 82 वर्षांचे होते. बाहुबली फेम अभिनेता प्रभासचे (Prabhas) ते काका होते. काकांच्या निधनाने प्रभासवर दु:खाचा डोंगरच कोसळला. कृष्णम राजू यांच्या अंत्यदर्शनाला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी प्रभासला अश्रू अनावर झाले. चिरंजीवी (Chiranjeevi) यांनी त्याचं सांत्वन केलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर आला आहे.

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी 1970 आणि 80 च्या दशकात कृष्णम राजू हे सर्वांत लोकप्रिय आणि यशस्वी तेलुगू अभिनेते होते. प्रभास हा त्यांचा लहान भाऊ आणि दिवंगत चित्रपट निर्माते उप्पलपती सूर्य नारायण राजू यांचा मुलगा आहे. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या बिल्ला या चित्रपटात प्रभासने पहिल्यांदाच काका कृष्णम राजू यांच्यासोबत काम केलं होतं. 2010 मध्ये वडिलांच्या निधनानंतर अनेकदा प्रभासने काकांशी फार जवळीक असल्याचं व्यक्त केलं होतं.

हे सुद्धा वाचा

फॅन क्लबद्वारे शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये प्रभासला अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळतंय. कुटुंबीय आणि अभिनेते चिरंजीवी हे त्याचं सांत्वन करत असल्याचं काही फोटोंमध्ये पहायला मिळतंय. चिरंजीवी यांनीसुद्धा कृष्णम राजू यांच्यासोबत काम केलं होतं.

रविवार सकाळी हैदराबादमधल्या रुग्णालयात कृष्णम राजू यांनी अखेरचा श्वास गेतला. ते कोविड-19 नंतरच्या आजाराने त्रस्त होते. तेलुगू सिनेसृष्टीत ते ‘रेबेल स्टार’ म्हणून ओखळले जायचे. कृष्णवेणी, सती सावित्री, रंगून रावडी, धर्मांतुडू, अंतिम थिरपू यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि 1998 ते 2004 दरम्यान दोनदा ते लोकसभेवर निवडून आले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री होते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.