प्रभासकडून चाहत्यांना व्हॅलेंटाईन डे गिफ्ट, ‘राधे श्याम’चे टीझर केले शेअर!

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभासच्या (Prabhas) ‘राधे श्याम' (Radhe Shyam) चित्रपटाची चाहेत आतुरतेने वाट पाहात आहेत.

प्रभासकडून चाहत्यांना व्हॅलेंटाईन डे गिफ्ट, 'राधे श्याम'चे टीझर केले शेअर!
‘राधे शाम’ या चित्रपटासाठी अभिनेता प्रभासनं 80 कोटीचं मानधन घेतलं आहे.
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 2:11 PM

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभासच्या (Prabhas) ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) चित्रपटाची चाहेत आतुरतेने वाट पाहात आहेत. 2018 मध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात प्रभाससोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रभासने नुकताच व्हॅलेंटाईन डेची भेट म्हणून चाहत्यांना या चित्रपटातील एक झलक दाखवली आहे. यामध्ये प्रभास रोमँटिक लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे देखील दिसत आहे. (Prabhas shares teaser of ‘Radhe Shyam’ movie)

View this post on Instagram

A post shared by Prabhas (@actorprabhas)

या व्हिडिओमध्ये प्रभास रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर इटालियन भाषेत आपल प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. हा व्हिडीओ 5 भाषांमध्ये तेलुगु, हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना प्रभासने चित्रपटाच्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. ‘राधे श्याम’ हा चित्रपट 30 जुलै 2021 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Prabhas (@actorprabhas)

प्रभास आणि पूजा व्यतिरिक्त या चित्रपटात सचिन खेडेकर, भाग्यश्री, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा शॉर्ट प्री टीझर रिलीज झाला होता. टीझरची सुरूवात प्रभासच्या बाहुबली लूकपासून झाली होती त्यानंतर ‘साहो’ चित्रपटाचा एक सीन ज्यामध्ये प्रभास रस्त्यावर फिरताना दिसत होता. या चित्रपटाचे शॉर्ट प्री टीझर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले होते की, संपूर्ण टीझर 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे संगीत जस्टिन प्रभाकरण यांनी केले आहे.

संबंधित बातम्या : 

व्हॅलेंटाईन डेचं धुमशान; अंकिता लोखंडे आणि विकी जैन शिमलामध्ये!

अर्जुन कपूरच्या टी-शर्टवर खास संदेश, मलायकाने शेअर केला फोटो !

‘सावधान इंडिया’च्या आर्ट डायरेक्टरसह दोघे अपघातात ठार; 20 तासांची शिफ्ट संपवून घरी जाताना दुर्घटना

(Prabhas shares teaser of ‘Radhe Shyam’ movie)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.