Adipurush | क्रिती सनॉनची कंबर पकडण्यासाठी प्रभास…., ‘आदिपुरुष’ फेम सेलिब्रिटींचा खास व्हिडीओ व्हायरल

‘आदिपुरुष’ फेम अभिनेत्री क्रिती सनॉन आणि प्रभास यांचा 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल; ज्यामध्ये क्रितीची कंबर पकडण्यासाठी अभिनेता...

Adipurush | क्रिती सनॉनची कंबर पकडण्यासाठी प्रभास...., ‘आदिपुरुष’ फेम सेलिब्रिटींचा खास व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 11:39 AM

मुंबई | सध्या सर्वत्र अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सनॉन स्टारर ‘आदिपुरुष’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमातील गाणी देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. एवढंच नाही तर सिनेमाची टीम गेल्या काही दिवसांपासून ‘आदिपुरुष’ सिनेमाचं जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. नुकताच, सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल. सिनेमाच्या दुसऱ्या ट्रेलर प्रदर्शनानंतर प्री-रिलीज इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये प्रभास आणि क्रिया ‘जय श्री राम’ गाणं सुरु असताना उभे राहिले. पण तेव्हा प्रभासने क्रितीच्या कंबरेवर हात न ठेवता, स्वतःच्या खिश्याच हात टाकला.. सध्या प्रभास आणि क्रितीचा व्हिडीओ चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत. सध्या सर्वत्र दोघांच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.

सिनेमाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात अभिनेत्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजामा घातला होता. शिवाय क्रिती काळ्या रंगाच्या साडीमध्ये कार्यक्रमात आली होती. दोघे देखील नव्या लूकमध्ये उत्तम दिसत होते. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की प्रभास दिग्दर्शक ओम राऊतसोबत उभा आहे आणि फोटो क्लिक करत आहे.

हे सुद्धा वाचा

तेव्हा प्रभासला क्रिती सनॉन मागे बसली आहे.. हे प्रभासच्या लक्षात येतं. अशात अभिनेता क्रितीला फोटोसाठी उठायला सांगतो. त्यानंतर प्रभास पहिल्यांदा क्रितीच्या कंबरेवर हात ठेवतो पण नंतर तिच्या कंबरेवर हात ठेवणं अभिनेत्याला योग्य वाटत नाही.. अभिनेत्याच्या कृतीमुळे सोशल मीडियावर सर्वत्र प्रभासची चर्चा रंगली आहे. शिवाय अनेक महिलांनी प्रभासच्या स्वाभावाचं कौतुक देखील केलं आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट करत चाहते प्रभासचं कौतुक करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणतो, ‘प्रभासने कसं स्वतःला थांबवलं…’, तर दुसरा नेटकरी म्हणतो, ‘प्रभासने क्रितीला पकडलं नाही.. खरा पुरुष हाच…’ सध्या सर्वत्र क्रिती आणि प्रभासचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंट वर्षाव करत आहेत.

‘आदिपुरुष’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, प्रभास आणि क्रिती सनॉन स्टारर ‘आदिपुरुष’ सिनेमा १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. पाच विविध भाषांमध्ये सिनेमा चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात, अभिनेता प्रभासने राघव, क्रिती सनॉन जानकी, सैफ अली खानने लंकेश, सनी सिंगने शेष आणि देवदत्त नागेनं बजरंग भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली आहे. दुसरा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते १६ जूनच्या प्रतीक्षेत आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.