The Kerala Story च्या माध्यमातून प्रकाश राज यांनी केंद्र सरकारवर साधला निशाणा; म्हणाले, ‘निवडणुकीत मत मिळवण्यासाठी…’

'निवडणुकीत मत मिळवण्यासाठी...', अभिनेते प्रकाश राज यांच्या पोस्टची सर्वत्र चर्चा, सिनेमाच्या माध्यमातून साधला केंद्र सरकारवर निशाणा... पश्चिम बंगालमध्ये सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी हिरवा कंदील

The Kerala Story च्या माध्यमातून प्रकाश राज यांनी केंद्र सरकारवर साधला निशाणा; म्हणाले, 'निवडणुकीत मत मिळवण्यासाठी...'
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 10:34 AM

मुंबई : दिग्दर्शक सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करताना दिसत आहे. सिनेमा येत्या काही दिवसांत २०० कोटी रुपयांचा गल्ला पार करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. एवढंच नाही तर अनेक ठिकाणी सिनेमाला विरोध करण्यात आला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील सिनेमाच्या प्रदर्शनावरील बंदी उठवली आहे. पश्चिम बंगालमध्ये सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी हिरवा कंदील दाखल्यानंतर अभिनेते प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे…

अभिनेता प्रकाश राज इन्स्टाग्रामवर सिनेमाचा एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये म्हणाले, ”प्रिय सर्वोच्च नेते…. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी काल्पनिक प्रोपगंडा फिल्मचा मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि वापर केल्याबद्दल तुमचा डिसक्लेमर काय आहे?’ असं म्हणत प्रकाश राज यांनी शेवटी जस्ट आस्किंग असं देखील लिहिलं आहे. सध्या सर्वत्र प्रकाश राज यांच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.

‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द करेळ स्टोरी’ सिनेमाने सर्वांच्या मनात घर केलं आहे. अनेकांनी सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली… सिनेमाने पहिल्या आठवड्यात १०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केलीा आहे. पण आता सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावला आहे. दुसऱ्या आठवड्यात गुरुवारी सिनेमाने फक्त ७ कोटी रुपयांच्या गल्ला जमा केला आहे. सिनेमाने आतापर्यंत १७१.७२ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे.

महत्त्वाचं म्हणजे, शनिवार – रविवार असल्यामुळे सिनेमा २०० कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल अशी अपेक्षा निर्मात्यांकडून वर्तवण्यात येत आहे. २०२३ मधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्यांपैकी ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा दुसरा सिनेमा ठरला आहे. अनेक वादांमळे अडचणीत अडकलेला ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा एक नवीन इतिहास रचताना दिसत आहे…

बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणारा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहे… मेकर्स सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित करण्यासाठी सज्ज झाले आहेत…

मिळालेल्या माहितीनुसार, झी नेटवर्कने ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचे स्ट्रीमिंग अधिकार विकत घेतले आहेत, त्यामुळे सिनेमा झी 5 वर प्रदर्शित होईल. निर्माते ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा ७ जुलै रोजी प्रदर्शित करू शकतात. मात्र, ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या निर्मात्यांनी याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.