Chandrayaan 3 बद्दल अभिनेत्याची वादग्रस्त पोस्ट, भडकलेल्या हिंदू संघटनांनी उचललं मोठं पाऊल
Chandrayaan 3 च्या यशाकडे जगभराचं लक्ष, पण 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या वादग्रस्त पोस्टमुळे सर्वत्र खळबळ... भडकलेल्या हिंदू संघटनांनी उचललं मोठं पाऊल... अभिनेत्याची वादग्रस्त पोस्ट चर्चेत...
मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : भारताचं चांद्रयान-3 आज चंद्रावर उतरणार आहे. त्यामुळे भारत आंतराळातील महाशक्ती म्हणून उदयाला येणार आहे. त्यामुळे भारताच्या या महत्त्वकांशी मिशन मूनकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. भारताचं चांद्रयान-3 अंतिम टप्प्यात असल्यामुळे मिशन पूर्ण व्हावं म्हणून प्रत्येक भारतीय प्रार्थना करत आहे. पण एका प्रसिद्ध अभिनेत्याने मात्र भारताचं चांद्रयान-3 बद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. भारताचं चांद्रयान-3 बद्दल वादग्रस्त पोस्ट करणारे अभिनेते दुसरे तिसरे कोणी नसून अभिनेते प्रकाश राज आहेत. भारताच्या चंद्र मोहिमेविरोधात अभिनेत्याच्या पोस्टने सर्वांनाच धक्का बसला आहे. म्हणून हिंदू संघटनांनी अभिनेत्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
प्रकाश राज यांनी चांद्रयानाबद्दल विनोदी पोस्ट शेअर केल्यामुळे सोशल मीडियावर त्यांना सतत ट्रोल करण्यात येत आहे. आता देशातील हिंदू संघटन नेत्यांनी प्रकाश राज याच्या विरोधात तक्रार दाखल करत, त्यांच्या विरोधात सक्त कारवाई करण्याची मागणी केली आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
BREAKING NEWS:- First picture coming from the Moon by #VikramLander Wowww #justasking pic.twitter.com/RNy7zmSp3G
— Prakash Raj (@prakashraaj) August 20, 2023
प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘इसरो’च्या मिशन चांद्रयान ३ ची खिल्ली उडवली आहे. प्रकाश राज यांनी मिशन मूनची खिल्ली उडवत एक व्यंग चित्र पोस्ट केलं आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती लुंगी लावून एका कपातून दुसऱ्या कपात चहा ओतताना दिसत आहे..
फोटो पोस्ट करत प्रकाश राज यांनी कॅप्शनमध्ये, ‘चांद्रयान – ३ च्या विक्रम लँडरचा येणार पहिला फोटो…’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र त्यांची पोस्ट व्हायरल होत आहे. म्हणून, नेटकऱ्यांनी कमेंट करत संताप व्यक्त केला आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘चांद्रयान हा देशाचा प्रकल्प आहे. आमची चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी, अशी आमच्यासारख्या कोट्यवधी भारतीयांची मनापासून इच्छा आहे आणि एक तुम्ही आहात! तुम्ही पक्ष आणि राष्ट्र यातील फरक विसरलात का? भाऊ सुधारा.’
आणखी एक नेटकरी प्रकाश राज यांच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला, ‘प्रकाश जी… इसरोच्या यशाला राजकीय द्वेषापासून दूर ठेवा. चांद्रयान मिशन इसरोचा आहे… भाजपचा नाही… जर चांद्रयान मोहिम यशस्वी झाली तर ते भारताचं विजय असणार आहे… कोणत्या पक्षाचं नाही…’ सध्या सोशल मीडियावर प्रकाश राज यांच्या पोस्टची चर्चा रंगत असून, त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.