Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप आमदाराचा विधानसभेत पॉर्न पाहतानाचा व्हिडीओ व्हायरल; प्रकाश राज म्हणाले..

याआधीही अशाप्रकारे पॉर्न पाहण्याचा व्हिडीओ समोर आला होता. 2012 मध्ये कर्नाटक विधानसभेत सहकारमंत्री लक्ष्मण सावदी आणि सी. सी. पाटील यांनासुद्धा असंच पॉर्न पाहताना पकडण्यात आलं होतं.

भाजप आमदाराचा विधानसभेत पॉर्न पाहतानाचा व्हिडीओ व्हायरल; प्रकाश राज म्हणाले..
MLA Jadav Lal Nath and Prakash RajImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 10:55 AM

अगरतळा : गुरुवारी त्रिपुराचे भाजप आमदार जादब लाल नाथ यांचा पॉर्न पाहतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना ते पॉर्न पाहत होते. त्याचवेळी त्यांच्या मागे बसलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. यावर सर्वसामान्य नेटकऱ्यांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेते प्रकाश राज यांनीसुद्धा या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. अनेकदा राजकीय आणि सामाजिक विषयांवर प्रतिक्रिया देणारे प्रकाश राज यांनी भाजप आमदाराचं हे कृत्य लाजिरवाणं असल्याचं म्हटलं आहे.

जादब लाल नाथ यांचा हा व्हिडीओ 30 मार्चचा असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये ते सभागृहात बसलेले दिसत आहेत आणि त्यांच्या हातात फोन आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावरन राजकीय घमासान सुरू झालं आहे. त्याचप्रमाणे सेलिब्रिटींच्याही प्रतिक्रिया समोर येत आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

जादब यांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली असून त्यांना स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आलं आहे, अशी माहिती त्रिपुरा भाजपचे अध्यक्ष राजीव भट्टाचार्य यांनी दिली. तर खुद्द जादाब यांनी या घटनेला आपल्याविरुद्धचं षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. जादब यांनी 2018 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्रिपुरामधील बागबासा विधानसभा मतदारसंघातील ते आमदार आहेत. सीपीएमच्या बिजिता नाथ यांचा त्यांनी निवडणुकीत पराभव केला होता. त्यानंतर यावर्षी पार पडलेल्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळविला. मात्र जादब यांना विधानसभेत पॉर्न पाहणं चांगलंच महागात पडलं आहे.

अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विटरवर जादब यांचा व्हिडीओ शेअर केला. त्यावर त्यांनी लिहिलं, ‘ब्ल्यू-जेपी.. लाज वाटली पाहिजे.’ या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडूनही विविध प्रतिक्रिया येत आहेत. याआधीही अशाप्रकारे पॉर्न पाहण्याचा व्हिडीओ समोर आला होता. 2012 मध्ये कर्नाटक विधानसभेत सहकारमंत्री लक्ष्मण सावदी आणि सी. सी. पाटील यांनासुद्धा असंच पॉर्न पाहताना पकडण्यात आलं होतं.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.