Besharam Rang Controversy: ‘भगव्या कपड्यांमधले पुरुष बलात्काऱ्यांचा..’; प्रकाश राज यांचा दीपिकाला पाठिंबा

'बेशरम रंग' गाण्याच्या वादात प्रकाश राज यांची उडी; दीपिकाचं समर्थन करत म्हणाले..

Besharam Rang Controversy: 'भगव्या कपड्यांमधले पुरुष बलात्काऱ्यांचा..'; प्रकाश राज यांचा दीपिकाला पाठिंबा
Prakash Raj, Deepika PadukoneImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 16, 2022 | 8:34 AM

मुंबई: शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटातील बेशरम रंग गाण्यावरून चांगलाच वाद निर्माण झालाय. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने घातलेल्या बिकिनीवरून तिला ट्रोल केलं जातंय. इतकंच नव्हे तर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचीही मागणी केली जातेय. यावर आता ‘सिंघम’ फेम अभिनेते प्रकाश राज यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. प्रकाश राज यांनी दीपिकाचं समर्थन केलंय. प्रकाश राज यांचं ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

काय म्हणाले प्रकाश राज?

‘भगव्य कपड्यांमध्ये पुरुष बलात्काऱ्यांचा सत्कार करतात, प्रक्षोभक भाषणं दिली जातात, आमदार फोडली जातात, भगवी कापडं घातलेले स्वामीजी लहान मुलांवर बलात्कार करतात, हे सगळं चालतं का? पण एका चित्रपटातील ड्रेस तुम्हाला पटत नाही? हा ढोंगीपणा आहे’, असं ट्विट त्यांनी केलं.

हे सुद्धा वाचा

नेमका काय आहे वाद?

पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. या गाण्यात दीपिकाचा आतापर्यंतचा सर्वांत बोल्ड अंदाज पहायला मिळतोय. या गाण्यातील एका सीनदरम्यान दीपिका केसरी रंगाच्या बिकीनीत पहायला मिळतेय. यावरूनच मोठा वाद निर्माण झालाय. पठाण चित्रपटातून सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप काही संघटनांकडून केला जातोय.

बेशरम रंग हे गाणं विशाल-शेखर या जोडगोळीने संगीतबद्ध केलं असून कुमार यांनी त्याचे बोल लिहिले आहेत. या गाण्यात शाहरुख आणि दीपिका यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्री पहायला मिळते. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

वादादरम्यान शाहरुखचं वक्तव्य

गुरुवारी पार पडलेल्या कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुखने हजेरी लावली. यावेळी उद्घाटनादरम्यान शाहरुखने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. “हे जग आता नॉर्मल झालंय. सर्वजण खुश आहेत. मी सर्वाधिक खुश आहे आणि हे सांगण्यात मला कोणतीही समस्या नाही की जगाने काहीही केलं तरी, मी, तुम्ही लोकं आणि जगात जितकेही सकारात्मक लोक आहेत, ते जिवंत आहेत”, असं तो म्हणाला.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.