Prakash Raj | प्रकाश राज यांच्या 3 वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ फोटोवरून वाद; FIR दाखल करण्याची होतेय मागणी
'सिंघम' फेम अभिनेते प्रकाश राज यांच्या एका जुन्या फोटोवरून नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली जात आहे. यामागचं कारण म्हणजे या फोटोमधील त्यांनी जो टी-शर्ट घातला आहे, त्यावरील मजकूर..
मुंबई : ‘सिंघम’ या चित्रपटात जयकांत शिक्रेची भूमिका साकारलेले दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांचा जवळपास तीन वर्षांपूर्वीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरून नवा वाद सुरू झाला आहे. सुप्रीम कोर्टाचे वकील शशांक शेखर यांनी प्रकाश राज यांचा हा फोटो ट्विट करत त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्याची मागणी केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी तमिळनाडू पोलिसांनाही टॅग केलं आहे. प्रकाश राज यांच्या त्या फोटोवर आक्षेप घेण्यामागचं कारण म्हणजे त्यांच्या टी-शर्टवरील मजकूर. प्रकाश यांनी फोटोमध्ये काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला असून त्यावर लिहिलंय, ‘मला हिंदी माहित नाही, जा’. यावरूनच हा वाद निर्माण झाला आहे.
प्रकाश राज यांचा हा फोटो पोस्ट करत शशांक यांनी तमिळनाडू पोलिसांना टॅग करून सवाल केला. ‘तुम्ही त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली का’, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर आता प्रकाश राज यांनीसुद्धा उत्तर दिलं आहे. शशांक यांचं ट्विट रिट्विट करत प्रकाश राज यांनी इंग्रजी आणि कन्नड या दोन्ही भाषांमध्ये ट्विट केलं आहे. ‘माझं मूळ, माझी मातृभाषा कन्नड आहे. जर तुम्ही त्याचा अपमान करत असाल, त्याचा आदर करत नसाल आणि तुमची भाषा माझ्यावर थोपवण्याचा प्रयत्न करत असाल तर मी तुमचा विरोध करणार. तुम्ही मला धमकी देताय का? सहज विचारतोय’, असं त्यांनी लिहिलंय.
Dear @tnpoliceoffl: have you registered an FIR against @prakashraaj? pic.twitter.com/VUhHVVWu90
— Shashank Shekhar Jha (@shashank_ssj) March 6, 2023
प्रकाश राज यांनी त्यांचा हा फोटो हिंदी दिवसाच्या निमित्ताने 13 सप्टेंबर 2020 रोजी पोस्ट केला होता. हा फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिलं होतं, ‘मी अनेक भाषा माहित आहेत, मी विविध भाषांमध्ये काम करू शकतो. मात्र माझी शिकवण अशी आहे की माझी धारणा, माझं मूळ, माझी ताकद, माझा गौरव.. माझी मातृभाषा कन्नड आहे’
ನನ್ನ ಬೇರು.. ನನ್ನ ಮೂಲ ನನ್ನ ಕನ್ನಡ.. ನನ್ನ ತಾಯನ್ನು ಗೌರವಿಸದೆ ನಿನ್ನ ಹಿಂದಿಯನ್ನು ಹೇರಿದರೆ ನಾವು ಹೀಗೇ ಪ್ರತಿಭಟಿಸುತ್ತೇವೆ .. ಹೆದರೊಲ್ಲ..ಅಷ್ಟೇ..My roots..my mother tongue is KANNADA .. if you DISRESPECT her and try to FORCE your language.. we will PROTEST like this. R u threatening #justasking pic.twitter.com/JaRLOhGKTT
— Prakash Raj (@prakashraaj) March 6, 2023
2020 मध्ये हिंदी दिवसानिमित्त दुसऱ्या राज्यातील अभिनेत्यांवर हिंदी भाषा थोपवण्याचा विरोध प्रकाश राज यांनी केला होता. हिंदी भाषा थोपवण्याच्या विरोधात बोलणाऱ्या अभिनेत्यांमध्ये धनंजय, प्रकाश राज आणि वशिष्ठ एन सिम्हा यांचा सहभाग होता. सोशल मीडियावर त्यांनी आपापल्या अंदाजात हिंदी दिवसबद्दल मत व्यक्त केलं होतं. आता त्याच पोस्टवर तीन वर्षांनंतर एफआयआर दाखल करण्याची मागणी होत आहे.