Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकर याच्यावर घराणेशाहीवरून निशाणा, प्रीती झिंटाचं सडेतोड उत्तर

घराणेशाहीवरून अर्जुन तेंडुलकरची खिल्ली उडवणाऱ्यांना प्रीती झिंटाचं सडेतोड उत्तर... सर्वत्र अर्जुन तेंडुलकर आणि प्रीतीच्या ट्विटची चर्चा...

Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकर याच्यावर घराणेशाहीवरून निशाणा, प्रीती झिंटाचं सडेतोड उत्तर
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 5:31 PM

मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने मंगळवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आयपीएल 2023 च्या 25 व्या सामन्यात पहिली विकेट घेतली. म्हणून अर्जुन तेंडुलकर चर्चेचा केंद्रबिंदू राहिला. अर्जुन तेंडुलकरने आपल्या मेहनतीच्या जोरावर क्रिकेटमध्ये पाय रोवत पहिल्याच सामन्यात उल्लेखणीय कामगिरी केली आहे. अर्जुन तेंडुलकरने भुवनेश्वर कुमारला बाद करून आयपीएलमधील विकेट घेतली. सध्या सर्वत्र अर्जुनचीच चर्चा सुरु आहे. पण क्रिकेट विश्वात पाय ठेवल्यानंतर घराणेशाहीवरून अर्जुन तेंडुलकर याच्यावर निशाणा साधण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून घराणेशाहीवरून अर्जुनची खिल्ली उडवणाऱ्यांना अभिनेत्री प्रीती झिंटाने सडेतोड उत्तर दिलं आहे.

पंजाब किंग्जची मालकीण अभिनेत्री प्रीती झिंटाने अर्जुनबद्दल एक ट्वीट केलं आहे. सध्या प्रीतीचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रीती ट्विट करत म्हणाली, ‘अनेकांनी घराणेशाहीवरून अर्जुनची खिल्ली उडवली. पण अर्जुनने स्वतःची जागा कशी निर्माण करायची हे देखवून दिलं आहे. अर्जुन तुला खूप शुभेच्छा… सचिन तुमच्यासाठी ही नक्कीच अभिमानस्पद बाब आहे.’ असं प्रीती ट्विट करत म्हणाली.

फक्त प्रीती हिनेच नाही तर, माजी क्रिकेटर मोहम्मद कैफनेही ट्विट करत अर्जुनचं कौतुक केलं आहे. ‘अर्जुन तेंडुलकरची प्रतिष्ठा प्रचंड वाढली आहे. अर्जुनवर कर्णधाराने ठेवलेला त्याने सार्थ करून दाखवला आहे.. आयपीएलमध्ये अर्जुनने पहिला विकेट घेतला आहे. अर्जुनचं मनापासून अभिनंदन… अर्जुनच्या उत्तम करियरसाठी प्रार्थना करतो…’ असं मोहम्मद कैफ म्हणाला आहे.

मुंबईने हैदराबादला 19.5 ओव्हरमध्ये 178 धावांवर ऑलआऊट केलं. मुंबईचा हा हॅटट्रिक विजय ठरला. हैदराबादकडून मयंक अग्रवाल याने सर्वाधिक 48 धावा केल्या. हेनिरिच क्लासेन याने 36, कॅप्टन एडन मार्करम याने 22, मार्को जान्सेन 13 आणि वॉशिंग्टन सुंदर याने 10 धावा केल्या. मुंबईच्या गोलंदाजांनी या व्यतिरिक्त एकाही बॅट्समनला दुहेरी आकडा गाठू दिला नाही.

मुंबईकडून जेसन बेहरनड्रॉफ, पियूष चावला आणि रिले मेरेडिथ या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. कॅमरुन ग्रीन आणि अर्जुन तेंडुलकर या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

अर्जुनने मोडला वडिलांचा रेकॉर्ड

अर्जुन तेंडुलकर याने आयपीएल 2023 मध्ये सनराजयर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात पहिली विकेट घेतली. अर्जुनने भुवनेश्वर कुमार याला आऊट केलं. अर्जुनने यासह सचिन तेंडुलकर याचा विकेट न घेण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तसेच अर्जुन तेंडुलकर कुंटुबातून आयपीएलमध्ये विकेट घेणारा पहिलाच सदस्य ठरला आहे.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.