Marathi Movie : ‘प्रीतम’ या चित्रपटात दिसणार उपेंद्र लिमये यांचं नवं रुप

अभिनेते उपेंद्र लिमये यांनी विविध चित्रपटांमधून आपल्या धमाकेदार आवाजाच्या आणि कसदार अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर स्वत:ची वेगळी छाप उमटवली आहे. (Pritam Movie, Upendra Limaye in new role)

Marathi Movie :  ‘प्रीतम’ या चित्रपटात दिसणार उपेंद्र लिमये यांचं नवं रुप
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 3:08 PM

मुंबई: अभिनेते उपेंद्र लिमये यांनी विविध चित्रपटांमधून आपल्या धमाकेदार आवाजाच्या आणि कसदार अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर स्वत:ची वेगळी छाप उमटवली आहे. चोखंदळ भूमिकेसाठी ओळखले जाणारे उपेंद्र सध्या गायक संगीतकाराच्या भूमिकेत झळकणार आहेत. हार्मोनियम सोबतचा फोटो बघून सध्या ते गायक संगीतकार झाले आहेत का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. नेहमीच निरनिराळ्या भूमिका करण्यासाठी प्राधान्य देणारे उपेंद्र अशीच एक वेगळी भूमिका ‘प्रीतम’ या आगामी चित्रपटातून साकारणार आहे. त्यासाठीच त्यांनी हार्मोनियमवर आलाप आणि ताना घेत गाण्याचा सूर धरला आहे. संगीतातील त्यांचं हे नवं पाऊल आगामी ‘प्रीतम’ या मराठी चित्रपटातील एका गाण्यासाठी असून उपेंद्र लिमये यांचा हटके अंदाज यात पहायला मिळणार आहे. येत्या 19 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘पावलो म्हसोबा रे’ ‘धावलो पिसोबा रे’ असे बोल असलेलं ‘प्रीतम’ चित्रपटातील हे भन्नाट गाणं अभिनेता उपेंद्र लिमये व प्रणव रावराणे यांच्यावर चित्रित झालं आहे. हे गाणं मस्त जमलं असून शब्द सुरांचा भन्नाट मिलाफ हे या गाण्याचं वेगळेपण म्हणता येईल. या गाण्यातून कोकणातल्या संस्कृतीच दर्शन घडवतानाच प्रेमाचा व आपुलकीचा रंगही जाणवतो. उपेंद्र यांचा हे गाणं प्रेक्षकांचं दिलखुलास मनोरंजन करणार आहे.

उपेंद्र लिमये, यांच्यासोबत प्रणव रावराणे आणि नक्षत्रा मेढेकर ही फ्रेश जोडी ‘प्रीतम’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अजित देवळे, विश्वजीत पालव, समीर खांडेकर, आभा वेलणकर, शिवराज वाळवेकर, अस्मिता खटखटे, नयन जाधव, आनंदा कारेकर हे कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

‘प्रीतम’ चित्रपटाची निर्मिती फैजल नितीन सिजो यांनी केली आहे. ‘अॅड फिल्म मेकर’ सिजो रॉकी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाची गीते गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. पार्श्वसंगीत विजय गावंडे यांचे असून शंकर महादेवन, अभय जोधापूरकर, मनिष राजगिरे यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.