‘बिग बॉस 16’ फेम प्रियांका चहर चौधरीवर चोरीचा आरोप; दाखल होणार गुन्हा?

या आरोपांवर अद्याप प्रियांकाने काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र तिचे चाहते प्रियांकाची बाजू घेत ट्विट करत आहेत. इशितासारखे अनेकजण प्रियांकावर आरोप करतात, कारण त्यांना तिला पाहून ईर्षा वाटते, असं चाहत्यांनी लिहिलंय.

'बिग बॉस 16' फेम प्रियांका चहर चौधरीवर चोरीचा आरोप; दाखल होणार गुन्हा?
Priyanka Chahar Choudhary Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 4:26 PM

मुंबई : ‘बिग बॉस 16’ या रिॲलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी अडचणीत सापडली आहे. प्रियांकावर कपडे चोरण्याचा आणि स्टाईल कॉपी करण्याचा आरोप आहे. इतकंच नव्हे तर तिच्याविरोधात गुन्हासुद्धा दाखल होऊ शकतो. प्रसिद्ध फॅशन डिझायनर इशिता गुप्ताने प्रियांकावर हे आरोप केले आहेत. तिने ब्रँडेड कपडे चोरले आणि माझी स्टाईलसुद्धा कॉपी केली, असे आरोप इशिताने प्रियांकावर केले आहेत. प्रियांकाने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट केले होते. बिज रंगाचा रफल लेहंगा परिधान करून तिने हे खास फोटोशूट केलं होतं. त्यानंतरच इशिताने तिच्यावर चोरीचा आरोप केला.

इशिताने असा दावा केला आहे की प्रियांकाने घातलेले कपडे हे तिच्या ब्रँडचे आहेत आणि त्या कपड्यांना तिने डिझाइन केलं होतं. प्रियांकाचे फोटो पाहताच तिने ट्विट करत आरोप केले. परदेशात स्थायिक झालेली फॅशन डिझायनर प्रियांकाने तिच्या ट्विटमध्ये लिहिलं, ‘एका वेड्या पीआर टीमसोबतची महिला, जी दुसऱ्यांना त्रास देणं बंद करत नाहीये. दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी तिने स्वत:ची बनावट पर्सनॅलिटी बनवली आहे.’

हे सुद्धा वाचा

‘ती विचार करत असेल की माझ्यासारखं दिसण्याचा प्रयत्न करून किंवा माझ्या डिझाइनचे कपडे परिधान करून ती माझ्यासारखी बनू शकते. यासाठी कदाचित तिला एक अब्ज पुनर्जन्म घ्यावे लागतील. माझे 30 हजार पाऊंडचे कपडे तिने चोरले आहेत. त्यावर मी काहीच बोलले नाही. कपडे तर चोरलेच पण तिला ब्लॉक केल्यानंतरही ती माझ्या स्टाइलला कॉपी करतेय’, असं तिने पुढे लिहिलं आहे.

आणखी एका ट्विटमध्ये इशिताने म्हटलंय, ‘माझ्याकडे तिने मागितले असते तर मी तिला दिले असते. मात्र पीआर करण्याची ही योग्य पद्धत नाही. स्वत: लढा आणि त्या लढाईवर पीआर करा. मला अशा अशिक्षितांसोबत संबंध ठेवण्यात काही रस नाही.’

या आरोपांवर अद्याप प्रियांकाने काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र तिचे चाहते प्रियांकाची बाजू घेत ट्विट करत आहेत. इशितासारखे अनेकजण प्रियांकावर आरोप करतात, कारण त्यांना तिला पाहून ईर्षा वाटते, असं चाहत्यांनी लिहिलंय. इशिताने तिच्या एका ट्विटमध्ये मुंबई पोलिसांना टॅग करत प्रियांकाची तक्रार केली आहे.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....