प्रियंका चोप्रा झाली आई! ‘या’ अब्जाधीशाच्या पत्नीनं सरोगसीद्वारे 22 मुलांना दिला जन्म
प्रियंका चोप्रा (Priyanka chopra) आई बनली आहे आणि निक जोनास (Nick Jonas) वडील. प्रियंका चोप्रा सरोगसी (Surrogacy) तंत्राद्वारे आई बनली आहे. अब्जाधीशाच्या पत्नीनं सरोगसीद्वारे 22 मुलांना जन्म दिला आहे.
प्रियंका चोप्रा (Priyanka chopra) आई बनली आहे आणि निक जोनास (Nick Jonas) वडील… प्रियंका चोप्रा सरोगसी (Surrogacy) तंत्राद्वारे आई बनली आहे. पण या तंत्रापूर्वीही अनेक नामवंत सेलिब्रिटी पालक बनले आहेत. अब्जाधीशाच्या पत्नीनं सरोगसीद्वारे 22 मुलांना जन्म दिला आहे. याचा उल्लेख त्यांच्या इन्स्टाग्राम बायोवरही करण्यात आला आहे. तिला सरोगसीनं 105 मुलांना जन्म द्यायचा आहे. क्रिस्टीना ओझतुर्क (Kristina Ozturk) असं या महिलेचं नाव आहे. महिलेचं वय 24 वर्षे आहे. ती रशियाची राजधानी मॉस्को इथं राहते. या महिलेनं अवघ्या एका वर्षात 21 सरोगेट बाळांना जन्म दिला. अलीकडेच तिनं आणखी एका मुलाला जन्म दिला आहे, म्हणजे एकूण 22.
10 मार्च 2020 रोजी झाला पहिल्या मुलाचा जन्म
‘डेली मेल’नं गेल्या वर्षी या महिलेबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. महिलेनं आपल्या मुलांसाठी 16 आयांना नेमलं आहे. ज्यावर 12 महिन्यांचा खर्च £67,700 (सुमारे 68 लाख रुपये) येतो. क्रिस्टीनाचा 57 वर्षांचा पती, गॅलिप ओझतुर्क (Galip Ozturk) हा व्यवसायाने हॉटेल व्यावसायिक आहे. जॉर्जियामध्ये दोघांची भेट झाली. क्रिस्टीनाला सरोगसीद्वारे 105 मुलं जन्माला घालायची आहेत. या महिलेच्या पहिल्या मुलाचा जन्म 10 मार्च 2020 रोजी झाला.
खर्च केले सुमारे 68 लाख
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, मार्च 2020 ते जुलै 2021दरम्यान, सरोगसीवर £142,000 (सुमारे 1 कोटी 43 लाख रुपये) खर्च करण्यात आला आहे. त्याचवेळी मुलांना पाहण्यासाठी त्यांच्या आयांववर त्यांनी सुमारे 68 लाख रुपये खर्च केले आहेत. क्रिस्टीना तिच्या मुलांवर आणि फक्त डायपर आणि इतर गरजांसाठी आठवड्याला £4,000 (रु. 4 लाख) खर्च करते.
View this post on Instagram
अनेक सेलिब्रिटी बनले आहेत पालक
प्रियंका चोप्रा आणि निक जोनास सरोगसीच्या माध्यमातून पालक बनले आहेत. दोघांनी 2018मध्ये लग्न केलं होतं. सरोगसी तंत्राच्या मदतीनं आई होणारी प्रियंका चोप्रा ही एकमेव बॉलिवूड सेलिब्रिटी नाही. त्याच्या आधी शाहरुख खान, आमिर खान, प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी, करण जोहर, एकता कपूर आणि तुषार कपूर यांसारखे अनेक स्टार्सही सरोगसीच्या मदतीनं पालक बनले आहेत.