Priyanka Chopra | 6 सेलिब्रिटींसोबत होते प्रियांका चोप्रा हिचे ‘प्रेमसंबंध’, ‘या’ तिघांचं नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
प्रियांका चोप्रा हिच्यामुळे मोडला असता बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींचा संसार; 'देसी गर्ल'ने 6 सेलिब्रिटींना केलंय डेट, पण तीन सेलिब्रिटींची नावे जाणून तुम्हीही व्हाल हैराण...
मुंबई | 23 जुलै 2023 : अभिनेत्री प्रियांका चोप्रा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते पण आता अभिनेत्री तिच्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेत आली आहे. काही वर्षापूर्वी प्रियांका हिने अमेरिकन गायक निक जोनस याच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगी देखील आहे. आता प्रियांका सोशल मीडियावर पती आणि लेकीसोबत व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असते. पण एक काळ असा होता जेव्हा प्रियांका फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, सेलिब्रिटींसोबत असलेल्या तिच्या नाते – संबंधांमुळे देखील तुफान चर्चेत आली. एक दोन नाही तर, तब्बल सहा सेलिब्रिटींसोबत देसी गर्लच्या नावाची चर्चा झाली. एवढंच नाही तर, काही विवाहित सेलिब्रिटींसोबत देखील अभिनेत्रीचं नाव जोडण्यात आलं. तर आज जाणून घेवू प्रियांका हिच्या खासगी आयुष्याबद्दल…
बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सर्वप्रथम प्रियांका हिचं नाव असीम मर्चेंट याच्यासोबत जोडण्यात आलं. तेव्हा प्रियांका मॉडेलिंग करायची. बॉलिवूडमध्ये पादार्पण केल्यानंतर अभिनेत्रीने असीम मर्चेंट याच्यासोबत ब्रेकअप केलं अशी देखील चर्चा रंगली…
असीम मर्चेंट याच्यानंतर प्रियांका हिचं नाव हरमन बावेजा याच्यासोबत देखील जोडण्यात आलं. हरमन चित्रपट निर्माता हॅरी बावेजा यांचा मुलगा आहे. सिनेमामुळे हरमन आणि प्रियांका एकत्र आले होते. पाच वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केल्याची देखील चर्चा रंगली. पण त्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
प्रियांका चोप्रा हिचं नाव बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर याच्यासोबत देखील जोडण्यात आलं. एवढंच नाही तर, काही मुलाखतींमध्ये देखील दोघांनी नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. जेव्हा ईडीने पहाटे अभिनेत्रीच्या घरावर छापा टाकला तेव्हा शाहिदने दरवाजा उघडला. त्यानंतर इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती. पण दोघांचं नातं अधिक काळ टिकू शकलेलं नाही.
प्रियांका चोप्रा आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या नात्याची देखील तुफान चर्चा रंगली. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र कम देखील केलं. पण जेव्हा अभिनेत्याची पत्नी ट्विंकल खन्ना हिला पतीच्या संबंधांबद्दल कळालं, तेव्हा ट्विंकलने अक्षय याला प्रियांका हिच्यासोबत काम करण्यास बंदी केली. त्यानंतर कधीत प्रियांका आणि अक्षय एकत्र दिसले नाहीत.
अनेक अभिनेत्यांसोबत अभिनेत्रीच्या नावाची चर्चा झाली, पण बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खान याच्यासोबत प्रियांका हिच्या नात्याची चर्चा रंगू लागली तेव्हा मात्र बॉलिवूडमध्ये सर्वत्र खळबळ माजली. अशात गौरीने देखील शाहरुख खान याला प्रियांका हिच्यासोबत काम करण्यास बंदी केली.
प्रियांकाचं नाव हॉलिवूड स्टार टॉप हिडलस्टनसोबतही जोडलं गेलं होतं. एका पार्टीत टॉप हिडलस्टन सर्वांलमोर देसी गर्लसोबत फ्लर्ट करताना दिसला तेव्हा दोघांच्या नात्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण या चर्चा अधिक काळ टिकल्या नाहीत.
प्रियांका चोप्रा हिचं रिलेशनशिपबद्दल मोठं वक्तव्य…
‘मी अनेक अभिनेत्यांना डेट केलं आहे. जे माझे सह-कलाकार होते त्यांना मी डेट केलं आहे. मला अंदाज होता रिलेशनशिप कसं आहे. ज्या अभिनेत्यांना मी डेट केलं होतं, ते सर्व उत्तम आणि प्रसिद्ध अभिनेते होते आणि आहेत. कदाचित माझं ब्रेकअप वाईट पद्धतीत झालं… पण ज्या अभिनेत्यांना मी डेट केलं ते चांगले होते..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली…